कारंजा (लाड) : प्रभू श्रीरामाचे गुरुवर्य वसिष्ठ ऋषींच्या शिष्य मंडळीपैकी सप्तर्षी करंजऋषी द्वारे स्थापीत कारंजा नगरीमधील आद्यदेवता आई श्रीकामाक्षा देवीच्या शारदिय नवरात्रोत्सवा निमित्त,सालाबादप्रमाणे शुक्रवार दि. १० ऑक्टोंबर २०२५ रोजी आई श्री कामाक्षा देवीच्या भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.सदहू कार्यक्रमाचे आयोजन श्री.कामाक्षा देवीचे अध्यक्ष हभप. दिंगबरपंत महाजन महाराज यांच्या मार्गदर्शनाने पुजारी रोहीत महाराज महाजन यांनी यशस्वी पणे केले होते. महाप्रसादाला कारंजेकर मातृभक्ताचे सहकार्य लाभले. लोक सहभागातून संपन्न झालेला महाप्रसादाचे वितरण सायंकाळी ०६:०० वाजता श्री. कामाक्षा देवीच्या महाआरती नंतर करण्यात आले. महाआरतीला राहुल महाराज महाजन उपस्थित होते. श्री.कामाक्षा देवीचे मुख्य गोंधळी संजय महाराज कडोळे,कमलेश कडोळे,दिनेश कडोळे,अथर्व कडोळे,प्रतिक हांडे आदींनी संबळ तुणतुणे आदी गोंधळी वाद्याच्या गजरात महाआरती केल्यानंतर सायंकाळी o७ : ०० वाजता महाप्रसादाचे वितरण सुरू करण्यात आले.रात्री उशीरा पर्यंत महाप्रसाद कार्यक्रम सुरू होता. यावेळी संपूर्ण कारंजा शहरातील मातृशक्ती उपासकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री कामाक्षा देवी संस्थान बद्दल सांगायचे झाल्यास श्री कामाक्षा देवीचे हे मंदिर करंज ऋषीच्या काळातील अतिप्राचिन मंदिर असून छत्रपती शिवरायांनी येथे येवून दर्शन घेतल्याचा इतिहास असून, आसाम मधील गोहाटीच्या कामाख्या देवीच्या कामपिठाचे मातृशक्तीपिठ असून येथे आदिशक्तीचे मुखमंडल असून ही देवता नवसाला पावणारी, भक्तांच्या मनोकामना पुर्ण करणारी जागृत देवता म्हणून ओळखली जाते.असे पुजारी हभप. दिंगबरपंत महाराज महाजन यांनी कळविल्याची माहिती पत्रकार संजय कडोळे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकातून दिली आहे.