वाशिम : बहुचर्चीत असलेला मंत्री मंडळाचा विस्तार नागपूर येथे होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनापूर्वी होणार असल्याच्या शक्यतेमुळे जिल्हयात नवनविन चर्चांना उधाण आले असून, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेन्द्र पाटणी,आमदार लखन मलिक, माजी आमदार विजय जाधव यांची नावे चर्चेत असल्याचे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेला प्राप्त झाले आहे. त्यामुळे मंत्री मंडळात राजेन्द्र पाटणी, विजय जाधव की लखन मलिक सरशी ठरणार . तिघांपैकी कुणाची वर्णी लागणार ? किंवा मंत्रीमंडळाच्या विस्तारात वाशिम जिल्हा उपेक्षितच ठेवल्या जाणार हे सुद्धा लवकरच कळणार आहे. जिल्हा स्थापने पासून प्रत्येक सरकारने, नव्याने स्थापित वाशिम जिल्ह्याला बहुतांश वेळी उपेक्षितच ठेवले असल्याने, वाशिम जिल्हयाचा विकासाचा अनुशेष अद्यापपर्यंत भरून निघाला नाही . त्यामुळे हा जिल्हा मागासलेला राहिला आहे . त्यामुळे विद्यमान शिंदे फडणवीस सरकारने भाजपा जिल्हाध्यक्ष तथा कारंजाचे आमदार राजेन्द्र पाटणी यांच्या रुपाने वाशिम जिल्ह्याचा मंत्रीमंडळ विस्तारात समावेश करावा अशी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाकडून मागणी होत आहे .