कारंजा: महाराष्ट्र शासन कला संचालनालय, मुंबई मार्फत घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षा 2022 चा निकाल नुकताच जाहीर झाला. याबाबत अधिक वृत्त कळवीतांना संजय कडोळे यांनी सांगीतले की, यावर्डी येथील श्री.बाबासाहेब धाबेकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रंग व कुंचल्याच्या माध्यमातून रेखाकला परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. शासकीय रेखाकला परीक्षा 2022 चा एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत 35 पैकी 35 विद्यार्थ्यां उतीर्ण झाल्यामुळे शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे.
श्री.बाबासाहेब धाबेकर विद्यालय, यावर्डी येथील दरवर्षी चित्रकला ग्रेड परिक्षेला विद्यार्थी प्रविष्ट होत असतात. शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये वर्ग 8,9 व 10 मधून एकूण 35 विद्यार्थी एलिमेंट्री चित्रकला ग्रेड परिक्षेला प्रविष्ट झाले होते.35 पैकी 35 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यामुळे शाळेचा चित्रकला ग्रेड परिक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील तसेच मुख्याध्यापक विजय देविदास भड व कलाशिक्षक एस. बी ओलिवकर यांना दिले आहे.
विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक यशाबद्दल शाळेचे संस्था अध्यक्ष केशवराव खोपे,संचालक देविदास काळबांडे मुख्याध्यापक विजय भड,शिक्षक राजेश शेंडेकर, गोपाल काकड, अनिल हजारे शिक्षकेत्तर कर्म.भालचंद्र कवाने,राजू लबडे, राजेन्द्र उमाळे,राजेश लिंगाटे आदिनी अभिनंदन केले. असे वृत्त मुख्याध्यापक विजय भड यांनी संजय कडोळे यांना कळवीले .