कारंजा : आमच्या भावकीतील माझे काका - स्व. बाबाराव शंकरराव कडोळे यांच्या आकस्मिक निधनामुळे आणि सध्या पाऊसाची सततधार सुरु असल्यामुळे, रुग्नांची गैरसोय होऊ नये म्हणून, माझ्या मित्रमंडळींनी वाढदिवसानिमित्त आयोजीत केलेले नेत्र चिकित्सा शिबीर रद्द करण्यात आलेले आहे . बुधवार दि .२७ जुलै २०२२ रोजी दरवर्षी प्रमाणे होणारे, नेत्रतपासणी व चिकित्साशिबीर स्थगीत करण्यात आलेले असून, आता हे शिबीर सप्टेंबर महिन्यात घेण्यात येईल. व तसे सर्वच गरजू रुग्नांना कळाविण्यात येईल तरी माझ्या सर्व चाहत्या नागरीकांनी क्षमा करावी अशी विनम्र प्रार्थना सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.