कारंजा (लाड) : कारंजा तालुक्यातील नैसर्गीक सौंदर्याने फुललेल्या,अडाण नदीच्या परिसरातील डोंगरी वनराईत महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने, "सोहळ काळवीट अभयारण्याचे" निर्माण केलेले असून,सदर अभयारण्यात हरीण,काळविट, रोही, निलगायी, ससे, रानडुक्कर आदी प्राण्यांचा मोर,तितर, चिमण्या, कावळे,बगळे आदी पक्षांचा किलबिलाट असतो. सदर अभयारण्या करीता बरेचसे काम प्रगती पथावर झालेले असून हे अभयारण्य पर्यटकांकरीता खुले झाल्यास निश्चितच सोहळ काळवीट अभयारण्यामुळे,कारंजा तालुक्याच्या विकासाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या जावू शकतो.आणि वनविभागाला पर्यटका कडून महसूल देण्यासोबतच ग्रामीण भागातील बेरोजगारांना लघुव्यवसायातून चांगल्या रोजगार प्राप्तिचे साधन प्राप्त होऊ शकतात.म्हणून येत्या सार्वत्रीक निवडणूका पूर्वी, मतदार संघाचे विकासपुरुष असलेले आमदार राजेन्द्र पाटणी यांनी याकरीता पाठपुरावा करून, सोहळ काळवीट अभयारण्य पर्यटकांकरीता खुले करण्याची मागणी, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाजसेवक संजय कडोळे यांनी केली आहे.