कारंजा (लाड) : शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, कारंजा नगरीमध्ये अगदी थोड्या थोडक्या दिवसांमध्ये शिक्षण क्षेत्रात नावलौकिक प्राप्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या,कारंजा येथील,प.पू.नारायण महाराज ज्ञान मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय,(मुर्तिजापूर रोड लगत असलेल्या) भिलखेडा कारंजा येथील शाळा महाविद्यालयातून,स्वकतृत्वावर शालेय अभ्यासक्रम व इतरही विविधांगी क्षेत्रात,नेत्रदिपक प्रगती करीत यशाचे शिखर सर करणाऱ्या गुणवंत सत्कारमुर्ती विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि आधुनिक तंत्रयुक्त प्रयोग शाळेचा उद्घाटन सोहळा आणि विद्यार्थी पालक मेळावा :- अमरावती विधानपरिषद मतदार संघाचे सदस्य,शिक्षक आमदार अँड.किरणरावजी सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली,उद्घाटक प्रा.डॉ.के.बी.देशमुख सर यांच्या शुभ हस्ते,शुक्रवार दि. 08 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी ठिक 12 : 00 वाजता संपन्न होणार आहे.
सदरहु कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती कारंजाचे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने ; प.पू. नारायण महाराज ज्ञानमंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष बाबारावजी पाटील नेमाने ; तारांगण इंग्लिश स्कुल धनजचे अध्यक्ष उदयराव इंगळे ; गायत्री परिवार हरिद्वारचे सदस्य हभप नामदेवराव मुंदे ; विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे ; खेर्डा काळीचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ समाजसेवक प्रदिप वानखडे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.याप्रसंगी प.पू.नारायण महाराज ज्ञानमंदिरामधून इयत्ता 12 वी प्रथम आलेल्या कु.उन्नती विठ्ठलराव हांडे,इयत्ता 10 वी प्रथम आलेल्या चि. ऋषीकेश शिंदे,भारतिय सांस्कृतिक ज्ञान परिक्षा हरिद्वारच्या परिक्षेमध्ये राज्यामधून द्वितीय आलेल्या कु गौरी अजय नेमाने,तसेच नॅशनल सायन्स ऑलिंपियाड,दिल्ली येथून गोल्ड मेडल मिळालेले विद्यार्थी कु.वैष्णवी गजानन शिरसाठ (इयत्ता 9 वी ),साहद सलिम चौधरी ( इयत्ता 9 वी ), शंतनु भारत राठोड (इयत्ता 9 वी ), कु.श्रध्दा भुषण लळे (इयत्ता 4 थी), आरव गोपाल वक्ते (इयत्ता 2 री ) कु.मंजली सुनिल रोठे (इयत्ता 9 वी) इत्यादी गुणवंत विद्यार्थ्यांचा,प.पू.नारायण महाराज ज्ञान मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे वतीने,विद्यार्थी हिताबाबत सदैव कार्यरत असलेले लोकप्रिय शिक्षक आमदार अँड.किरणराव सरनाईक व मान्यवर पाहुण्यांचे हस्ते गुणगौरव करण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थी व पालक मंडळीनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक शिक्षण संस्थेचे सचिव संजय नेमाने आणि मुख्याध्यापिका कु.गायत्री नेमाने यांनी केले असल्याचे वृत्त त्यांचेकडून प्राप्त झाले आहे.