वरोरा तालुक्यातील आसाळा ह्या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेले किशोर डुकरे गेली चार -पाच वर्षांपासून समाजकार्याच्या प्रवाहात आले. सामाजिक बांधिलकी जोपासून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचून त्यांनी विविध समस्याना हात घातला. शेतकरी, शेतमजूर, मनोरुग्ण, पीडित शेतकरी,अन्यायग्रस्त,अपलघातात जखमीवर लवकर उपचार व्हावा यासाठी वाहनद्वारे दवाखान्यात पोहचवीने अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता सदैव तत्पर व सजग असतात.त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलने, उपोषणे केलीत. प्रशासनाशी न्यायिक लढा देऊन शेतकऱ्यांच्या संबंधित प्रश्नांना वाचा फोडली.
सामाजिक कार्यकर्ता किशोर डुकरे यांनी जे मनोरुग्ण आहे त्यांना कसलेही भान नसते, इतरत्र भटकत असतात. त्यांना स्वच्छ करून त्यांच्या आरोग्याची दखल घेऊन पूर्ण बरे झाल्यानंतर त्यांच्या स्वगृही पोहचवून सेवा देण्याचे महान कार्य त्यांनी सुरु केले. चिमूर येथील दिव्यवंदना आधारसंस्था यांच्या सोबत वरोरा शहरातील मनोरुग्ण शोधून त्यांची आंघोळ, दाढी, कटिंग करून नवीन कपडे देऊन आरोग्याची तपासणी करने, आवश्यकता भासल्यास त्यांच्या राहण्याची व्यवस्था सुद्धा केली जाते त्यानंतर त्या मनोरुग्णला औषधी देऊन पूर्णतः बरे झाल्यानंतर ओळख पटल्यानंतर त्यांच्या स्वगावी त्यांच्या नातेवाईकांकडे पोहचविल्या जाते. घरचा एखादा व्यक्ती मनोरुग्ण आहे किंवा भटकतं आहे किंवा हरवीला आहे. आणि सुस्थितीत तो जर घरी पोहचत असेल तर त्यावेळेस नातेवाईकांचे चेहऱ्यावर आनंद झळकतं असतो तोच आनंद किशोर डुकरे यांना होतो.
मनोरुग्णांच्या सेवेला किशोर डुकरे हे खरी ईश्वर सेवा मानतात. प्रत्येक समाजघटक घटक किशोर डुकरे यांना धन्य मानतात. त्यांच्या मनोरुग्णांच्या समाजसेवेत लक्ष्मण आहे आसुटकर, दिनेश काकडे, प्रवीण कळसकर, टायगर ग्रुप चे तालुकाध्यक्ष ऋषभ रठे आदी युवकांचे सहकार्य लाभले.