वाशीम- वृद्ध कलावंतांच्या मानधन वाढीच्या मुद्यासाठी विदर्भ लोककलावंत संघटनेकडून गेल्या दहा वर्षापासून शासनासोबत झगडत आहे. सद्या विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत असून विविध राजकीय पक्षांनी प्रसिध्द केलेल्या जाहिरनाम्यात वृद्ध कलावंतांच्या मानधनवाढीचा उल्लेख नाही. मात्र महाविकास आघाडीने नुकत्याच जाहिर केलेल्या जाहिरनाम्यात वृद्ध कलावतांच्या मानधन वाढीचा मुद्दा समाविष्ट केल्याने विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या वतीने अध्यक्ष संजय कडोळे यांनी महाविकास आघाडीचे आभार मानले आहेत.
निवडणूक निमित्ताने परत एकदा त्यांनी संघटनेमार्फेत विविध राजकिय पक्ष आणि उमेदवारांसह, महायुती व भाजपाचे पक्षश्रेष्ठी देवेन्द्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे; महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार, सौ. सुप्रियाताई सुळे, नानाभाऊ पटोले आदींना निवडणूकीपूर्वी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात वृद्ध लोककलावंताना न्याय मिळवून देण्याचा मुद्दा समाविष्ट करण्याची गळ घातलेलेली होती. त्यानुसार महाविकास आघाडीने आपल्या निवडणूक जाहिरनाम्यात विदर्भ लोककलावंत संघटनेच्या मागणीला प्राधान्य देवून वृद्ध लोककलावंत मानधन वाढीचा मुद्दा समाविष्ट केला. त्याबद्दल सर्वत्र महाविकास आघाडी जाहिरनाम्याचे आभार मानण्यात येत आहे.तर महायुतीकडून वृद्ध कलावंताच्या मागणीला केराची टोपली दाखवील्या गेली. त्यामुळे लोककलावंतानी महायुतीवर नाराजी व्यक्त केली आहे. उल्लेखनिय म्हणजे महाविकास आघाडीने विशेष दखल घेऊन स्वातंत्र्यानंतर प्रथमच वृद्ध लोककलावंत हे देखील मतदार आहेत याची जाणीव ठेवून जाहिरनाम्यात आपला मुद्दा घेतल्या बद्दल,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाजसेवक तथा विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे, उमेश अनासाने, विजय खंडार, शेषराव इंगोले, शाहीर देवमन मोरे, लोमेश पाटील चौधरी, हभप अजाब महाराज ढळे, हभप माणिक महाराज हांडे, हभप दिगंबरपंत महाराज, सुरेश हांडे, गजानन घुबडे, सौ. तुळसाबाई चौधरी, सौ. इंदिराबाई मात्रे, कांताबाई लोखंडे, देवकाबाई इंगोले, सौ. सरलाबाई इंगोले आदींनी महाविकास आघाडी पक्षाचे राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार, सुप्रियाताई सुळे यांचे जाहीर आभार मानले आहेत.