छत्रपती शिवाजी महाराज हा प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व अथांग आहे. महाराष्ट्रातल्या रयतेला एकत्र करून त्यांना स्वराज्याचा अर्थ समजावणारे छत्रपती एकच होऊन गेले. उत्तम प्रशासन, युद्धकौशल्य, रणनीतीमधला दूरदृष्टीपणा, रयतेबद्दलचा जिव्हाळा, अफाट शौर्य, उत्कृष्ट नेतृत्व असे सगळे गुण एकत्र असणारे छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल शासक होते. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना जनसंपर्क कार्यालय सोंदरी व ब्रम्हपुरी येथे शिवसेना महिला आघाडी ब्रम्हपुरी येथे फाल्गुन वद्य तृतीयेला तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रा.अमृत नखाते चिमूर विधानसभा क्षेत्र व सोंदरी चे सरपंच केवलराम पारधी उपतालुका प्रमुख ब्रम्हपुरी यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी छत्रपती शिवरायांचा जयजयकार केला.
प्रसंगी गावकर्यांना अल्पोहार तसेच मिठाई चे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ.रामेश्वर राखडे उपतालुका प्रमुख ब्रम्हपुरी, गुलाब बागडे विभाग प्रमुख, पृथ्वीराज नान्हे, संभाजी ढोंगे, भास्कर दोनाडकर , विजय देशमुख, बाबुराव ढोरे, प्रेमदास दाणी, बंडू बन्सोड, अजय येलतुरे , पंढरी गभणे तसेच महिला आघाडी च्या उर्मिला अलोणे उपजिल्हा संघटिका, कुंदा कमाने तालुका संघटिका, ललिता कांबळे शहर संघटिका, दीपिका दुनेदार, राखी बानाईत यांच्यासह शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.