कारंजा (लाड) : दरवर्षी प्रमाणे श्री रुक्मिणी विदर्भ पिठ अंबिकापूर कौंडण्यपूर येथील श्रीमद् जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी राजराजेश्वर माऊली सरकार यांचा जन्मोत्सव आणि श्री रुक्मिणी महोत्सवाचे आयोजन श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे दिनांक ११ ते १२ डिसेंबर २०२४ पर्यंत अंबिकापूर येथे करण्यात आले असून त्यानिमित्त लाखो भाविकांच्या उपस्थितीत सलग दोन दिवस धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे भरगच्च आयोजन असणार आहे. त्यानिमित्ताने सालाबादप्रमाणे स्वामिजींचे वाशिम जिल्ह्यातील शिष्य मंडळी तथा भाविक भक्तांनी उपस्थित राहून स्वामिजींच्या जन्मोत्सव व श्री रुक्मिणी देवी महोत्सव कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कारंजा तालुक्यातील ग्राम शेलूवाडा येथील स्वामी परिवारातील स्वामीजींचे भक्त रामदासभाऊ कांबळे यांनी केले असल्याचे स्वामी परिवारातील अंबाबाईचे गोंधळी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.