कारंजा : आषाढ महिना म्हटला म्हणजे वारकर्यांना,मायबाप विठुरायाच्या दर्शनाकरीता माहेरी पंढरपूरला जाण्याची ओढ लागते. त्यामुळे सालाबादप्रमाणे याही वर्षी कारंजा आगाराने,कारंजा ते पंढरपूर यात्रा गाड्यांची उत्तम व्यवस्था केली होती. दि.२८ जून रोजी सुद्धा कारंजा आगाराकडून, यात्रा गाडी सोडण्यात आली यावेळी गाडीचे चालक संतोष आमटे तथा वाहक विज धनबहादूर हे होते. या यात्रा गाडी मध्ये कारंजा येथील आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउदेशिय संस्थेच्या,अमरावती विभागीय पर्यावरण मार्गदर्शिका सौ. कृपाताई ठाकरे ह्या वारकर्यांच्या सेवेकरीता व पर्यावरण प्रसारा करीता जात असल्याचे त्यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे कैलास हांडे यांना सांगीतले. व पायदळ वारीतील वयोवृद्ध आई बांबाना आपण खंडुचक्का आयुर्वेदिक औषधी वितरण करणार असून पर्यावरण विषयक माहिती देणार असल्याचे सुद्धा सांगितले.सदर बसमध्ये दरवर्षी वारी करणारे तुळजापूर येथील बाळू सावरकर, बाबुसिंग ठाकुर व सौं किरण बाबुसिंग ठाकुर, वसंतराव श्रीराव, उंबर्डा, विजुबाई काळे, अंतकलाबाई साबंधरे, शोभाबाई कडू,वंदना गुल्हाने,उकंडा चव्हाण व अन्य वारकरी मंडळी होते.कारंजा येथील जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाचे आणि विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे तथा कैलास हांडे यांनी बसस्थानकावर उपस्थित राहून या सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देऊन, श्रीक्षेत्र पंढरपूर करीता निरोप दिला.