बालवयातच स्वतःच्या कुटुंबावर आणि स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वतःचे संपूर्ण जीवन समाजकार्याकरीता वाहून घेणारे,प्रदिप विनायकराव वानखडे यांना पाहिले की,प्रत्येकाला लाल बहादूर शास्त्री यांचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही.अशाप्रकारे साध्या राहणी आणि उच्च विचारसरणीने जगणारे दखल घेण्यासारखे ,प्रदिप वानखडे यांचे आदर्श प्रभावी व्यक्तिमत्व आहे. कारंजा येथे वानखडे परिवारात, वडिल विनायकराव वानखडे (गुरुजी) व आई सुधाताई यांच्या कुटुंबात प्रदिप वानखडे यांचा दि.२५ एप्रिल १९६४ रोजी जन्म झाला.त्यांना तिन भाऊ व एक बहिन असून भावंडामध्ये त्यांचा तिसरा क्रमांक आहे.त्यांचे शिक्षण इयत्ता बारावी डी.डी. एम.ए. एच. (डिप्लोमा) पर्यंत झाले असून,शिक्षण शिकत असतांनाच त्यांना भारतिय स्वातंत्र्याचा इतिहास वाचण्याची आवड निर्माण झाली.त्यामुळे त्यांना बालपणापासूनच समाज कार्यात रूची निर्माण होऊन,एखादी शासकिय नोकरी करून बांधील राहून,केवळ कुटूंबाकरीता जगण्यापेक्षा,समाजातील दुःखी कष्टी जनतेच्या सेवेकरीता आयुष्य वेचण्याची त्यांनी प्रतिज्ञा करून समाजाकरिता जीवन समर्पित करण्याचे त्यांनी ठरवीले. विशेषतः राजकारण करीत असतांना संत पदाला पात्र ठरलेल्या आणि अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारसरणीने तसेच देशाकरीता सर्वस्व वाहिलेल्या देशाचे प्रथम पंतप्रधान पंडीत नेहरू,राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडला आणि त्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या काँग्रेस विषयी त्यांना आवड निर्माण होऊन ते काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते झाले.कारंजा येथील बेघर,भूमिहिन लोकांच्या हक्काच्या घरासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ते मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला. कारंजा येथील इंदिरागांधीनगर, संजय गांधी नगर इत्यादी वसाहती निर्माण करून बेघरांना घरे उपलब्ध करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.हजारो विद्यार्थ्याच्या शैक्षणिक अडचणी त्यांनी सोडविल्या.शेकडो शासकिय कर्मचारी भावंडाच्या स्थानांतराच्या अडचणी सोडविल्या.शेतकरी,शेतमजूर, कामगार यांच्या न्याय्य हक्काकरीता शेकडो आंदोलनात हिरीरीने सहभाग घेतला.त्याकाळी बालवयात वाशिमचे तत्कालिन खासदार गुलामन बी आझाद,माजी राज्यमंत्री व नंतरचे खासदार भाऊसाहेब अनंतराव देशमुख, माजी राज्यमंत्री योजनामहर्षी स्व . बाबासाहेब धाबेकर यांना निवडून आणण्याकरीता रात्रंदिवस पराकाष्ठा करीत त्यांच्या विजयश्री करीता मोलाचे भरीव कार्य केले व पुढे प्रदिप वानखडे हे काँग्रेसच्या ह्या नेत्यांचे लाडके कार्यकर्ते म्हणून सुद्धा ओळखू लागले होते.सहकारी मित्रमंडळीच्या आग्रहाखातर बालवयातच त्यांनी धनाढ्य व दिग्गज प्रतिस्पर्ध्याविरुद्ध,कारंजा नगर पालिकेच्या तिन निवडणूका लढल्या मात्र धनाढ्या समोर केवळ तिन चार मतांच्या फरकामुळे त्यांना यश प्राप्त करता आले नाही.काँग्रेस पक्षात अकोला जिल्हा युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस,सेवादल काँग्रेस,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी मध्ये अनेक जबाबदारीची महत्वाची पदे त्यांनी भूषविली व अनेक वेळा अखिल भारतिय काँग्रेस अधिवेशनाला संपूर्ण भारतभर हजेरी लावली.पुढे पक्षाने त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी,कारंजा तालुका पुनर्वसन समिती,जिल्हा अन्न व पुरवठा समिती,कारंजा आगारा अंतर्गत राज्य परिवहन महामंडळ सल्लागार समिती,पंचायत समिती अंतर्गत शिक्षण सुधार समिती इत्यादी मध्ये निमशासकिय सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली.सन २००३ मध्ये त्यांनी ग्रामपंचायत खेर्डा (काळी) ची निवडणूक लढविली व ह्या निवडणूकीत बहुमताने विजय होऊन त्यांनी सन २००३ ते २००७ पर्यंत खेर्डा (काळी) ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून आपली कारकिर्द पूर्णतः यशस्वी केली.सरपंच असतांना त्यांनी कारंजा येथील श्री खोलेश्वर संस्थान,ऋषी तलाव,शिवायनमः मठ,बायपास कारंजाचा परिसर खेर्डा (काळी) ग्रामपंचायत हद्दीत येत असल्याचे शासनाच्या निदर्शनी आणून दिले व खेर्डा ग्रामपंचायतचे महसूल उत्पन्न वाढवीले.या काळात योजना महर्षी स्व.बाबासाहेब धाबेकर यांचे निकटवर्ती सक्रिय कार्यकर्ते म्हणूनही त्यांनी काम केले व स्व.बाबासाहेब धाबेकर यांच्या निधीमधून आपल्या मतदार संघात रस्त्याची,सांडपाण्याच्या नाल्याची,सभागृहाची कामे करून घेतली. शेकडो निराधार व्यक्तिंना स्व.संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला. शेकडो बेरोजगार व्यक्तिंना कर्जपुरवठा मिळवून देत व्यवसाय मिळवून दिला.शिवाय त्यांच्या कारकिर्दीतील महत्वाचे सार्वजनिक कार्य म्हणजे कारंजा बायपासवरील चिमुकल्यांकरीता त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळी खेर्डाची स्थापना शासनाकडून करवून घेतली व आज ही शाळा यशस्वीरीत्या सुरु आहे.तसेच सन २००७ रोजी होऊ घातलेली,नगर पालिकेची हद्दवाढ त्यांनी जवळ जवळ २०२१ पर्यंत होऊ दिली नाही. त्यामुळे एकीकडे त्यांनी सर्वसामान्यांवर पडणारा न.प. च्या कराचा बोझा वाचवीला तर दुसरीकडे खेर्डा ग्रामपंचायतचे उत्पन्न सुद्धा वाचविण्यात यश मिळविले होते.अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाने आपले संपूर्ण जीवन समाजसेवेचे व्रत घेऊन, समाजा करीता समर्पित केल्याचेच त्यांच्या जीवन कार्यातून स्पष्ट होत असून शासनाने त्यांच्या जीवन कार्याचा गौरव म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनाद्वारे पुरस्कृत करावे अशी भावना अमरावती विधानपरिषद मतदार संघाचे आमदार अँड किरणराव सरनाईक, कारंजाचे आमदार राजेंद्रजी पाटणी, सहकारनेते सुनिलभाऊ धाबेकर, पाटणी साहेबांचे स्विय सहाय्यक संजय भेंडे, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे व प्रदिप वानखडे यांच्या सहकारी मित्रमंडळीनी व्यक्त केली आहे.
लेखक : संजय कडोळे ( महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त.) गोंधळीनगर, कारंजा (लाड) जि.वाशिम. मो.९०७५६३५३३८