ब्रम्हपुरी :- न्यायासाठी आस धरून बसलेल्या कोतवाल भरती परीक्षार्थ्यांची 15 जूनला झालेल्या तालुक्यातील कोतवाल भरती परीक्षेत अपारदर्शकता असल्याची तक्रार होती.
परीक्षेला जेवढे पात्र परीक्षार्थी असतील तेवढेच प्रश्न पत्रिका व उत्तर पत्रिका असायला पाहिजेत. परंतु अधिकच्या प्रश्न पत्रिका व उत्तर पत्रिका होत्या, इतकंच नाही तर कोतवाल भरतीच्या कामाची हलकाई इतकी वाढली की ज्या दिवशी परीक्षा झाली, त्याच दिवशी अगदी 3 तासाच्या आत पेपर चेकिंग करून यादी प्रसारित करण्यात आली. कोणी 10 लाख दिले तर कोणी 12 लाख लाच दिले. अशा बऱ्याच चर्चेला तालुक्यात पेट सुटला.या आधारावर स्पष्ट होते. ह्यात आर्थिक लेन - देण झालेच असतील.
अशा बऱ्याच संशयावरून परीक्षा झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ह्या समस्येला रक्तविर सेना फाउंडेशन मार्फत उठाव करण्यात आले. योग्य कायद्याच्या चौकटीत राहून विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी मुख्यमंत्री, महसुल मंत्री, पालकमंत्री (चंद्रपूर जिल्हा), व जिल्हाधिकारी (चंद्रपूर जिल्हा) यांना उपविभागीय अधिकारी, ब्रम्हपुरी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
किंबहुना आता पर्यंत ह्या समस्येचा निधान लागलेला नाही. अहो..जिल्हाधिकारी साहेब ब्रम्हपुरी कोतवाल भरतीला न्याय तुम्ही देणार काय...? अशी आर्त हाक निहाल ढोरे, अध्यक्ष, रक्तविर सेना फाउंडेशन यांनी दिली आहे.