तिरोडा, गोंदिया, दिंनाक : ११ मे २०२२ : तक्रारदार हे शेतकरी असुन त्यांची वडोलो पार्जीत दीड एकर शेती मौजा येडमाकोट ता. तिरोडा जि. गोदिया येथे आहे. सदर शेती ही तक्रारदार यांचे वडीलांचे नावे असुन वडीलाची शेती संबंधीत सर्व कामे तक्रारदार हे पाहतात महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे एकात्मीक फलोत्पादन विकास अभियान सन २०२१-२२ योजने अंतर्गत तक्रारदार यांनी त्यांच्या वडीलाचे नावे आपले सरकार डीबीटी या पोर्टलवर दिनांक १०:०२.२०२२ रोजी ऑनलाईन अर्ज ट्रक्टर या बाबी करीता केला होता. त्यात त्याची त्या बाबीसाठी निवड झाल्याचे तालुका कृषी अधिकारी तिरोडा यांचे कडुन पूर्व संमतीपत्र प्राप्त झाले होते.
त्यानुसार तक्रारदार यांनी ट्रक्टर खरेदी करून त्याचे बोल/पावती संबंधीत पोर्टलवर अपलोड केले होते. त्यानंतर दिनांक ४.०५.२०२२ रोजी कृषी पर्यवेक्षक अ. खंडाईत यानी ट्रॅक्टर व ट्रॅक्टर संबंधीत वीले व पावतीत तपासुन पाहुन व्यवसायीक परिक्षण रिपोर्ट मध्ये ट्रॅक्टरच्या नावावरून त्रुटी काढली सदर त्रुटी न काढता सदर प्रस्ताव मान्य करून शासनाकडे अनुदान रक्कम मंजुरीस पाठविण्याकरीता अर्जदाराने १०,०००/- रुपये ची लाचेची मागणी केली.
त्यावेळी तक्रारदाराने त्यांना नाईलाजाने होकार दिला. तक्रारदारास गैअ. यांना लाच रक्कम रु. १०,०००/- देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी गेर.अ. विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्या करीता दि. १०.०५.२०२२ रोजी ला.प्र.वि, गोंदिया येथे तक्रार नोंदविली.
प्रकरणी आज दि. ११.०५.२०२२ रोजी गेर.अ. श्री. प्रेमानंद पांडुरंग खंडाईत, कृषी पर्यवेक्षक यांची तक्रारदाराकडे असलेल्या लाच मागणीच्या योग्य पडताळणी अंती गेअ. यांचे विरुद्ध बस स्थानक समोर तिरोडा येथे लाचेचा यशस्वी सापळा रचण्यात आला. सदर सापळा कार्यवाही दरम्यान गै.अ. श्री. प्रेमानंद पांडुरंग खंडाईत, कृषी पर्यवेक्षक (वर्ग-३) यानी तक्रारदाराचे ट्रक्टरच्या नावावरून त्रुटी नकाढता सदर प्रस्ताव मान्य करून शासनाकडे अनुदान रक्कम मंजुरीस पाठविण्या करीता तक्रारदाराकडे रु ८,०००/- लाच रकमेची पंचासमक्ष मागणी करून ती लाग रक्कम पंचासमक्ष स्विकारली. त्यावरून गे अ. श्री. प्रेमानंद पाडुरंग खंडाईत, यांचे विरुध्द पो.स्टे. तिरोडा, जि. गोदिया येथे कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात येत आहे.
सदर ची कामगिरी श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, श्री मधुकर गिते, अपर पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, श्री. पुरुषोत्तम अहेरकर, पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि. गोंदिया यांचे मार्गदर्शनात पोनि. अतुल तवाडे, पोहवा मिलकीराम पटले, पो हवा. संजय बोहरे, ना.पो.शि. राजेंद्र बिसेन, ना.पो.शि. मंगेश कहलकर, ना.पो.शि. अशोक कापसे, ना.पो.शि. संतोष बोपचे, बालक ना.पो. शि. दिपक बाटबर्वे सर्व ला.प्र.वि. गोदिया यांनी केली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....