कारंजा : पेट्रोल डिझेलच्या महागाईची झळ शासनाने कमित कमी जिवनावश्यक अन्नधान्याच्या किमंतीवर तरी बसू देऊ नये. आज तुरीचे दाळ अव्वाच्या सव्वा चढ्या भावाने बाजारात विकल्या जात असून हातावर पोट असणाऱ्या चाकरमान्यांनी आणि शेतमजूरांनी कशी खरेदी करावी . "आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या" अशी त्यांची परिस्थिती आहे . तेव्हा शासनाने, बालगोपालांच्या जेवणामधून "दाळीचे वरण"काढून घेऊ नये . कारण मोठी माणसे तिखट - मिठासोबतही आपला गुजारा करतील . परंतु चिमुकल्यांचे काय ? निदान चिमुकल्यांना आणि आजारग्रस्त वयोवृद्धांना तरी तरी त्यांच्या आहारातील हक्काचे आवडते असलेले, "तुरीच्या दाळीचे वरण" मिळावे म्हणून, शासनाने रास्त धान्य दुकानातून तुरदाळीचे वाटप करण्याची मागणी, प्रसार माध्यमाद्वारे सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी शासनाकडे केली आहे .