कारंजा : वाशिम जिल्हा होऊन जवळ जवळ पंचवीस वर्ष होत असतांना कारंजा नगरी मात्र अद्यापही विकासा पासून वंचितच आहे. त्याचे कारण म्हणजे दुदैवाने आजपर्यंतही कारंजाच्या मातीत जन्माला आलेला एकही विधानसभा सदस्य या नगरीला मिळालेला नाही. त्यामुळे कारंजा नगरीचा विकासच झालेला नाही. जनमाणसात प्रिय असणारी निःस्वार्थ, प्रेमळ, मनमिळाऊ आणि तळागाळातील गोरगरीब सच्च्चा मतदारांना विश्वासात घेऊन कारंजेकरांचा विश्वास संपादन करणारी व्यक्ती या मतदार संघाला मिळालेलीच नाही . त्यामुळे या मतदार संघात विकासाची कामे हवी तशी झालेलीच नाही. येथील माध्यमीक शिक्षण संस्था प्रगतीच्या शिखरावर असतांनाही उच्च शिक्षणाच्या मात्र येथे कोणत्याच सोई सुविधा येथे नाहीत. बहुजनांच्या विकासाकरीता सामाजिक न्याय भवनाची इमारत नाही.नागरीकांच्या हाताला काम मिळावे म्हणून औद्योगीक वसाहत सुद्धा येथे उभी राहू शकलेली नाही त्यामुळे उलटपक्षी येथील शेतकर्यांचे सोने असलेल्या कापसाचे छोट्यामोठ्या गीरण्या, कोळी मधील सुतगीरणीही बंदच पडली आहे. भारतातील पहिली बाजारपेठ म्हणून प्रचलित कृषी उत्पन्न बाजार समिती असतांनाही येथे शेतकर्याच्या शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहू शकलेले नाहीत. आणि त्यामुळे येथील तळागाळातील लोकांच्या बेरोजगारीचा प्रश्न सदैव अनुत्तरीतच राहिलेला आहे. हे झालं मतदार संघाच्या बाबत.!
आता कारंजा शहराच्या विकासाबद्दल बोलायच झाल्यास, शहरात कोणत्याच प्रकारची स्वच्छता दिसत नाही. भारत सरकारचा स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम असतांनाही शहरात मात्र स्वच्छ शहर कार्यक्रमाचा बोजवारा वाजलेला आहे. आज चौका चौकात कचऱ्याचे ढिगारे लागलेले दिसतात. पुरुषाचे तर सोडा परंतु आमच्या आया बहिणींकरता स्वच्छतागृहे नाहीत. प्रत्येक चौकात वाहनतळ, मुत्रीघरांची गरज असतांना सुद्धा कोठेही दिसत नाहीत. नाल्या सांडपाण्यांची कोणतीच व्यवस्था नाही. खड्डयात रस्ते की रस्त्यातच खड्डे हे वाहन धारकांना कळत नाही. नगरपालिके जवळ मध्यावधी शहरात मोक्क्याची अब्जावधी रुपयाची जागा असतांना तेथे एखादे मार्केट, नगर पालिकेचे रुग्नालय उभे राहू शकलेले नाही. एवढेच काय तर सध्या प्रत्यक्ष नगर पालिकेचा कारभारही मोडकळीस असलेल्या धोकादायक इमारती मधून चालते. त्यामुळे शताब्दी पूर्ती झालेल्या नगर पालिकेच्या काही कार्यालयांना बायपासवर भाडोत्री संसार थाटावा लागत असल्याचे कटूसत्य आहे. इमारतफंड मिळाल्यानंतर परत जातो. शहरात सर्वत्र पाईपलाईन होऊन पाच सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतरही पाईपलाईन जंग खात पडलेल्या आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नविन टाक्या अर्धवट होऊन पुढील कामाची वाट बघत आहेत. मात्र अद्याप पर्यत कारंजेकराच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होऊ शकलेली नाही. स्थानिक महात्मा फुले मार्केट, जुना भाजी बाजार गांधी चौकातील नगर पालिकेचे शॉपींग सेंटर बंद पडलेले आहे. एवढेच नाही तर नगर पालिकेतील मनमानी कारभाराने कर्मचार्यांना त्यांचे हक्काचे पगार वेळेवर मिळत नाही. शासन आदेशाची अमंलबजावनी न करता दिव्यांगांचा निधी सुद्धा दिव्यांगांच्या खात्यात वळता केला जात नाही. मनमानी वार्डरचना करून शहराचे वाटोळे केल्या जात आहे. तेव्हा ही परिस्थिती बदलवून कारंजा शहराचा विकास जर साधायचा असेल तर यापुढे कारंजा नगर पालिकेचा नगराध्यक्ष जनतेमधूनच निवडला जाणे जरूरी आहे. आज केन्द्रात सरकार भाजपाचे आहे. राज्यातली सरकार भाजपाचेच आहे आणि त्यामुळे भविष्यात कारंजा नगरीचा नगराध्यक्षही भाजपचाच असणे अत्यावश्यक असून पुढील नगराध्यक्ष म्हणून कारंजा शहरातील चारित्र्यसंपन्न, निस्वार्थ, प्रामाणिक , मनमिळाऊ आणि तळागाळातील गोरगरीब व्यक्तींमध्ये सहजपणे मिसळणार्या ललित चांडक यांचेकडे बघीतले जात असल्याचे मत प्रसार माध्यमाकडे समाजसेवक संजय कडोळे यांनी व्यक्त केले असून ललित चांडक यांनी भविष्यातील नगर पालिका लढविल्यास गटबाजी,पक्षभेद, जातीभेद, धर्मभेद विसरून कारंजेकर मतदार बहुसंख्य मतांनी त्यांना निवडून देतील व कारंजा शहराची वाटचाल विकासाच्या दृष्टीने होणार असल्याचे निर्विवाद सत्यही संजय कडोळे यांनी व्यक्त केले आहे.