वाशिम : केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे १० मार्च रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी ९ वाजता शासकीय वाहनाने जालना येथून वाशिम जिल्हयातील कोंडाळा (झामरे) कडे प्रयाण करतील. सकाळी ११ वाजता वाशिम तालुक्यातील कोंडाळा (झामरे) येथे आयोजित श्रध्दा होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्राच्या उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दुपारी १ वाजता कोंडाळा (झामरे) येथून मोटारीने जालनाकडे प्रयाण करतील. असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना प्राप्त झाले आहे.