राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्याच्या अतिवृष्टीची संदर्भात संपूर्ण माहिती महसूल विभाग व भाजपा लोकप्रतिनिधी यांच्याकडून घेऊन ताबडतोब शेतीचे सर्वे व पावसामुळे झालेले घरांच्या नुकसान भरपाई संदर्भात सर्वे करण्याचे निर्देश दिले आहे.
भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्याशी संवाद साधून जिल्ह्याची संपूर्ण माहिती घेऊन तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल यांच्याशी सुद्धा चर्चा करून नामदार फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनात त्वरित दिले आहे संकट काळात महाराष्ट्र शासन व महायुती सरकार खंबीरपणे उभे असल्याची गरज असल्याची त्यांनी सांगून संकटाचा सामना करताना नागरिकांनी संयम पाळावा तसेच नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थानी जावे आपले जीवन जीवित हानी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे अशी ही विनंती नामदार फडणवीस यांनी केली आहे.
आपला वाढदिवस सेवा दिवस म्हणून कार्यकर्त्यांनी साजरा केल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले जनतेला समर्पित तसेच संकट काळामध्ये मदत करण्याच्या दृष्टीने भाजप कार्यकर्त्यांनी आज पावसामध्ये जिल्हाभर मध्ये फिरून नागरिकांना दिलासा देण्याचा काम केलं याबद्दल सुद्धा कार्यकर्त्यांचे आभार नामदार फडणवीस यांनी मानले आहे.
तेलारा तसेच मुर्तीजापुर बार्शीटाकळी पातुर अकोला तालुका अकोट तालुक्याची संपूर्ण माहिती प्रशासनाकडून आमदार फडणवीस यांनी घेऊन परिस्थितीवर नजर ठेवून सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी सरकार असल्याचे सांगून ताबडतोब 52 मंडळाचा सर्वे करून अहवाल पाठवण्याची निर्देश दिले आहे