कुरखेडावरून देसाईगंज देसाईगंजकडे येताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट झाडाला धडकली. यात शिक्षक दीपक शामराव पिल्लेवान यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजता घडली. विसोराच्या बसस्थानकापासून देसाईगंज मार्गावर अवघ्या २०० मीटर अंतरावर सदर अपघात झाला.
कुरखेडा तालुक्यातील चिखली येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षक दीपक शामराव पिल्लेवान (४९) हे जागतिक योग दिननिमित्त शाळेत गेले होते. तिथून ते तहसील कार्यालय, कुरखेडा येथे बीएलओ म्हणून कामासाठी गेले. परत कुरखेडावरून देसाईगंजला येत होते. दरम्यान पिल्लेवान यांचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटले. दुचाकीसह पिल्लेवान रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक देत शेतात पडले. यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.