गडचिरोली :- नजीकच्या पुलखल येथील युवकाच्या खून प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी आरोपीच्या आईसह अटक केली आहे. यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या दोन झाली आहे.आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून युवकाचा खून करण्यात आल्याची घटना गडचिरोली शहरानजीकच्या पुलखल येथे ५ जुलै रोजी घडली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी नरेश गेडेकर ( ३२ ) याला न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान पोलिसांनी तपास केला असता या प्रकरणात आरोपी नरेश गेडेकर याची आई ललीताबाई देवराव गेडेकर (५१) हिचाही हात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. यामुळे पोलिसांनी तिलाही अटक केली. तिला न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने तिला शुक्रवार ८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलिस करीत आहेत.