ब्रम्हपुरी :
वैनगंगा नदीला आलेल्या महापुरात तालुक्यातील रणमोचन गावाकडे जाणाऱ्या फाट्या लागतचा ब्रह्मपुरी आरमोरी राष्ट्रीय महामार्ग रस्ता वाहून गेला होता. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या एकाच बाजूने वाहतूक व स्थानिक नागरिकांचे आवागमन सुरू होते. मात्र गेल्या दोन-अडीच वर्षांपासून सदर रस्त्याची प्रशासनाच्या वतीने दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे रस्त्याच्या एकाच बाजूने वाहतूक सुरू असताना आवागमन करणाऱ्या प्रवाशांना रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे या ब्रह्मपुरी आरमोरी राष्ट्रीय महामार्ग 353 डी रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम प्रशासनाच्या वतीने त्वरित करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी शिवसेनेचे नरू नरड व संभाजी ब्रिगेड ब्रम्हपुरीचे शहराध्यक्ष राजेश माटे, सामाजिक कार्यकर्ते मोंटू पिलारे यांच्या नेतृत्वात मान.नितीनजी गडकरी, रस्ते व परिवहन मंत्री भारत सरकार, गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग गडचिरोली, चंद्रपुर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना ब्रम्हपुरीचे उपविभागीय अधिकारी संदिप भस्के यांच्या मार्फत निवेदन प्रेषित करण्यात आले.
सन 2019 मध्ये ब्रह्मपुरी आरमोरी राष्ट्रीय महामार्ग 353 डी रस्त्याचे काँक्रिटीकरण अजवानी कंपनीकडून पूर्ण करण्यात आले होते. मात्र सन 2020 मध्ये ऑगस्ट महिन्यात वैनगंगा नदीला आलेल्या महापुरात तालुक्यातील रणमोचन गाव फाट्या लागतचा राष्ट्रीय महामार्गावरील एकतर्फी रस्ता वाहून गेला होता. रस्ता वाहून गेल्याने रोड लागत 400 मिटर लांब 5 फूट खोल खड्डा पडला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या एकाच बाजूने वाहतूक व स्थानिक नागरिकांचे आवागमन सुरू होते. मात्र दोन-अडीच वर्षांचा कालावधी उलटून सुद्धा प्रशासनाच्या वतीने सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. एकाच बाजूने वाहतूक सुरू असताना, प्रवासी नागरिकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर अनेक अपघात घडले. या रस्त्यावर घडलेल्या अपघातात आठ ते दहा प्रवासी नागरिकांचा मृत्यू झाला असून जवळपास दहा-बारा लोकांना अपंगत्व आले आहे. सदर राष्ट्रीय महामार्ग हा आवागमन करणाऱ्या प्रवाशांसाठी मृत्यू मार्ग ठरत आहे.
याउलट खरबी गावा नजीक राष्ट्रिय महामार्गावर बांधण्यात आलेला येथील टोल नाका सर्रास पणे सुरु आहे. ब्रह्मपुरी आरमोरी राष्ट्रीय महामार्ग 353 डी या एकतर्फी रस्त्यावर अपघात होऊन मृत्युमुखी पडणाऱ्याच्या प्रमाणात वाढ होत असलेल्या घटनेकडे शासन व प्रशाशन झोपेचे सोंग घेऊन सर्रास दुर्लक्ष करीत आहेत. शासन व प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आणखी किती प्रवाशी नागरिकांचा बळी जाणार, अपघाताची श्रुंखला केव्हा बंद होणार? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राष्ट्रिय महामार्गावर अपघात होऊन प्रवाशी नागरिकांची होणारी जीवित हानी टाळण्यासाठी सदर महामार्गरस्त्याचे कामाला येत्या 5 दिवसात सुरुवात करावी, अन्यथा शिवसेना ब्रम्हपुरी व संभाजी ब्रिगेड शहर ब्रम्हपुरीच्या वतीने खरबी येथील टोलनाका बंद पाडण्यात येईल व खरबी टोलनाका येथे बेमुदत आंदोलन करण्यात येईल. आंदोलना दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, अशी प्रमुख मागणी असलेल्या आशयाचे निवेदन शिवसेनेचे नरू नरड व संभाजी ब्रिगेड ब्रम्हपुरीचे शहराध्यक्ष राजेश माटे, सामाजिक कार्यकर्ते मोंटू पिलारे यांच्या नेतृत्वात मान.नितीनजी गडकरी, रस्ते व परिवहन मंत्री भारत सरकार, गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग गडचिरोली, चंद्रपुर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना ब्रम्हपुरीचे उपविभागीय अधिकारी संदिप भस्के यांच्या मार्फत निवेदन प्रेषित करण्यात आले.
निवेदन देतेवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मिलिंद भणारे यु. से.अध्यक्ष अमोल माकोडे, खुर्शीद अली शेख,पराग माटे,स्वप्नील राऊत,अमित मेश्राम, अमित सरजारे,शशिकांत तलमले, आकाश मेश्राम, रुपेश मेश्राम,दीक्षित बागडे,अभिषेक चांदेकर, शरद नाकाडे आदी. शिवसेना व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....