वरोरा :- अवैध रीत्या रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकांवर नायब तहसीलदार उल्हास लोखंडे यांनी दिनांक 22 जानेवारीला रात्री बारा वाजताच्या सुमारास कारवाई केली. त्या ट्रक मधील अवैध रेती व दोन ट्रक असे एकूण एक कोटी 23 लाख 74 हजाराचा मुद्देमान जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला. ते जप्त केलेले दोन ट्रक त्याच रात्री पावणे पाचच्या सुमारास चार चाकी वाहनातून आलेल्या तीन ते चार आरोपींनी पळवून नेल्याची तक्रार पोलीस स्टेशन वरोरा येथे देण्यात आली. त्या तक्रारी वरून पोलिसांनी शोध घेण्याकरिता दोन पथके तयार करण्यात आले त्यातील एक वर्धा व दुसरे अमरावती येथे पाठविण्यात आले होते. अमरावती येथून पोलीस अधिकाऱ्यांना दिनांक 23 जानेवारीच्या रात्री ट्रक जप्त करण्यात यश आलेले आहे. पोलिसांनी अवघ्या 24 तासात या घटनेचा छडा लावला असले तरी ते ट्रक चोरून नेणारे आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाता बाहेर आहे. पोलिसांना त्या आरोपींचा शोध लावण्यास यश मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.