देवाडा मार्गावर तर एमआयडीसी चिंचाळा परिसरात 60 पेक्षा अधिक गोवंशाची तस्करी करणाऱ्यांना अटक करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वाहन चालकासह 7 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
राजुरा तालुक्यातील गडचांदूर-देवाडा रोडवर राजुरा पोलिसांनी 5 वाहनांमधून 22 गोवंशाची सुटका केली. ही कारवाई परिवक्षाधीन पोलिस उपअधीक्षक विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात एपीआय धर्मेंद्र जोशी, उपपोलिस निरीक्षक सदानंद वडस्कर, खुशाल टेकाम, किशोर तुमराम, तिरूपती जाधव, भारत राठोड यांनी केली.
वाहन क्र. एमएच 33 जी 1217, एमएच 40 सीडी 7068, एम. एच. 34 एबी 4322, एच एच 34 बीजी 3479, एमएच 34 बीजी 2131 या पाच वाहनांमध्ये जनावरांना निर्दयतेने कोंबून कत्तलखान्यात नेण्यात येत होते.या प्रकरणी वाहन चालक व वाहकासह 7 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गोपाल समय्या कुंदाराम (52) रा. कोष्टा सागर शामराव मडावी (19), सय्यद नसीम सय्यद फईम ( 34 ) रा. गडचांदूर, दिलीप किसन बावणे, गौसीद्दीन कमाल शेख ( 38 ), अजय बापू मेंगीनवार ( 25 ), रा. लक्कडकोट यांचा समावेश आहे. वाहन चालक फरार झाला आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध वन्यजीव अधिनियम सह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.