मानोरा : देश,धर्म,राष्ट्रहिताची तळमळ आणि शेतकरी,ग्रामस्थ, तळागाळातील सर्वसामान्य, वयोवृद्ध,रुग्नांच्या च्या सेवेचे व्रत जबाबदारीने सेवाव्रती या नात्याने पार पाडत असतांना सुदाम तायडे यांनी भाजपापक्ष संघटनासाठी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वतःचे जीवन निःस्वार्थपणे भाजप पक्षासाठी वाहून दिल्याचे दिसून येते.शेतीव्यवसाय सांभाळत असतांना त्यांनी समाजातील रुग्नांच्या सेवेसाठी अनेकवेळा रात्री बेरात्री गरजूंसाठी सहकार्य केले. तरुणाईत असतांना त्यांनी भाजयुमो मध्ये तिन वर्षे सरचिटणीसपद,त्यानंतर भाजपा मध्ये मानोरा तालुका सरचिटणीस म्हणून सुद्धा नऊ वर्षेपर्यंत भाजपाचे संघटन कार्य केले. व प्रदेश कार्यालयाच्या आदेशाचे पालन करून आजतागायत विविध कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवीला.मागील वर्षापासून पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमाची आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजू पाटील राजे यांच्या नेतृत्वात,संपूर्ण मानोरा तालुक्याच्या प्रत्येक खेडोपाडे वस्ती तांड्यावरील लाडक्या बाहिनींना लाडकी बहिन योजनेंतर्गत लाभ मिळावा म्हणून नोंदणी अभियान यशस्वीपणे राबवीले. अशा त्यांच्या विविध सेवाव्रती कार्यामुळे आणि विशेष म्हणजे त्यांच्या हजरजवाबी,कार्यतत्पर, हास्यमुख,सुस्वभावी,मनमिळावू स्वभावाने त्यांनी आपल्या सभोवती हजारो ग्रामस्थ, शेतकरी,शेतमजूर,कामगार, लोककलावंत, व्यापारी, डॉक्टर, शिक्षक व भाजपा कार्यकर्त्यांचे वलय आपल्या सभोवती निर्माण केले आहे.सध्या मानोरा तालुक्यात भाजपा तालुकाध्यक्ष पद रिक्त आहे.भविष्यात जिल्हा परिषद,नगर परिषद,पंचायत समिती,ग्रामपंचायत निवडणूका होऊ घातलेल्या आहेत तर त्या दृष्टीने अशा सेवाव्रती कार्यकर्त्याची निवड तालुकाध्यक्षपदी करावी. अशी मागणी सुदामजी तायडे यांच्या चाहत्यांकडून होत आहे.