आरमोरी येथे ग्रामविकासासाठी गावाचा सहभाग या विषयावर जाहीर व्याख्यान संपन्न
आरमोरी:-
गावाचा विकास करायचा असेल तर गावाची प्राथमिक गरज ओळखून आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रयत्न करणे हे सरपंच,ग्रामसेवक व सदस्य यांनी गावकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय गावाचा विकास होऊ शकत नाही असा विकास मंत्र विकास पुरुष, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त,आदर्श सरपंच मा.भास्करराव पेरे पाटील यांनी आरमोरी येथे सरपंच संघटना आरमोरीच्या वतीने "ग्रामविकासासाठी गावाचा सहभाग" या विषयावर जाहीर व्याख्यानातून मार्गदर्शन करतांना विकास मूलमंत्र सांगितला.
सरपंच संघटना तालुका आरमोरी यांच्या वतीने दि.09/04/2022 ला दुपारी 12.00वाजता स्वागत सेलिब्रेशन गार्डन पॅलेस येथे आयोजित केला होता.त्या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कल्याणकुमार डहाट तहसीलदार आरमोरी,उदघाटक श्री एम के कालबांडे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन आरमोरी,प्रमुख वक्ते श्री भास्करराव पेरे पाटील,विशेष अतिथी श्री आनंद ठिकरे तालुका आरोग्य अधिकारी, अविनाश मेश्राम वनक्षेत्रपाल आरमोरी,श्री.आर टी पारधी पंचायत विस्तार पंचायत समिती आरमोरी, श्री.अँड.देवा पाचभाई व सरपंच संघटना अध्यक्ष संदीप ठाकूर उपस्थित होते.
"ग्रामविकासासाठी गावाचा सहभाग" या विषयावर जाहीर व्याख्यानात गावाचा विकास करण्यासाठी सहा बाबीकडे लक्ष देणे महत्वाचे आहेत.पाणी,झाडे,शिक्षण,,वृद्ध परिवाराचे संगोपन,लोकसंख्या,या विषयावर विस्तृत असे मार्गदर्शन केले.या जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमाला आरमोरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, सदस्य उपस्थित होते.या कार्यक्रमात सूत्रसंचालन श्री.राजू धात्रक सर,प्रास्ताविक व आभार श्री संदीप ठाकूर अध्यक्ष तालुका सरपंच संघटना आरमोरी तथा प्रभारी सरपंच ग्रा.पं. जोगीसाखरा यांनी केले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच संघटनेच्या पदाधिकारी यांनी सहकार्य केले.