कारंजा (लाड) : श्री गुरुमाऊली च्या शुभाशिर्वादाने पुनीत झालेल्या धाबेकर साहेबांच्या कर्मभूमी कारंजा नगरीत,जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, बाबासाहेब धाबेकर कापूस पणन महासंघ कर्मचारी शेतकरी सहकारी सुतगीरणी कारंजाचे अध्यक्ष,जिल्हा परिषद अकोला गटनेते सहकार महर्षी, योजना महर्षी, शेतकरी नेते, विकास पुरुष मा.श्री. सुनिलभाऊ पाटील धाबेकर यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, दि.19 डिसेबर 2023 रोजी दुपारी 02:30 वाजता, कारंजा लाड येथील मा.श्री. सुनिलभाऊ धाबेकर मित्र परिवाराचे वतीने,स्व.बाबासाहेब धाबेकर सांस्कृतिक सभागृह कारंजा येथे भव्य अशा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, कारंजा-मानोरा तालुक्यातील व शहरातील सर्व मा.श्री. सुनिलभाऊ धाबेकर यांचे हितचिंतक,कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.असे वृत्त प्रसिध्द पत्रकाव्दारे , आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.