विद्यानगर कुर्झा (ब्रम्हपुरी ) येथील रहिवासी अरूण अलोने यांचे २७ जानेवारी 2023ला ह्दयविकाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या कुटुंबात १८ सदस्यांची संयुक्त कुटुंबपद्धती व अंत्यंत खडतर जीवनप्रवासातून स्वत:च्या कुटुंबाची आध्यात्मिक व आर्थिक प्रगती साधून समाजापुढे एक चांगला आदर्श त्यांनी निर्माण केला होता. मृत्यू समयी त्यांचे वय ६६ वर्ष होते.अखिल खेडूले कुणबी समाजाने एक चांगलं व्यक्तिमत्व गमाविल्याचे श्रद्धांजलीपर मनोगत प्रा. दिवाकर पिलारे, प्रा.मोहनजी वाडेकर,गोवर्धनजी दोनाडकर, केशवजी आंबोने, नरेश ठक्कर सर यांनी व्यक्त केले. अरुणजी अलोने हे मनमिळावू स्वभावाचे होते. यांच्या निधनाने त्यांच्या कुटूुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. त्याचा अंत्यसंस्कार कुर्झा येथील स्मशानभूमीत येथे आज दि.२७ जानेवारी २०२३ ला करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन मुले ,सुना, पुतणे, नातवंड असा आप्त परिवार आहे.