गोंदिया-धापेवाडा-तिरोडा मार्गावर काल १५ जून बुधवारला झालेल्या टिप्पर ट्रॅक्टरच्या अपघातात काल एकाचा मृत्यू झाला होता. तर अपघातातील एका जखमीचा आज १६ जून रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिसरा जखमी सुध्दा गंभीर असल्याचे बोलले जात आहे. सदर मृत इसमाचे मृतदेह घेऊन रुग्णवाहिका गावात पोहचताच नागरिकांनी आक्रोश व्यक्त करीत पोलीस प्रशासनाविरोधात रास्ता रोको आंदोलन केले. सोबतच महालगाव मुरदाडा येथील रास्ता रोको आंदोलन ची माहिती मिळताच!..सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दुपारी २ वाजेच्या सुमारास नागरिकांनी दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये पोलीस निरिक्षक भोसले यांच्यासह ४ पोलीस कर्मचारी सुध्दा जखमी झाले आहेत.
या घटनेतील मृताच्या कुटुबियांना दिड लाख रुपये व जखमींचा उपचारखर्च देण्याचे टिप्पर मालकाने काल मान्य केले होते, त्यानतंरही ती रक्कम न दिल्याने नागरिकात आधिच रोष असताना पुन्हा आज दुसरा मृतदेह गावात पोचल्याने नागरिकांनी रास्ता रोको चक्का जाम आंदोलन केले.