चंद्रपूर येथील बल्लारपूर कडे जाणाऱ्या बंगाली कॅम्प-बायपास मार्गावरील एचपी पेट्रोल पंप समोर भीषण अपघात झाल्याची घटना आज रात्री 8 वाजता घडली.
चंद्रपूर शहराजवळील बल्लारपूर बायपास रोड, शिव मंदिराजवळ, बल्लारपूरकडून येणार्या ट्रक क्रमांक एमएच ३४-एव्ही-२७२४ मध्ये पल्सर एमएच ३७-क्यू-५१५१ या युवकासह १२ वर्षीय मुलाची समोरासमोर धडक झाली. अपघातात पल्सर चालक गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे आणि सोबतच्या मुलाची प्रकृती ठीक आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पल्सर स्वार आणि मुलगा या दोघांनाही ट्रकखालून काढण्यात आले असून, त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले.