नवनिर्वाचित पहिल्या महिला आमदार सईताई डहाके यांची मंत्रीमंडळात वर्णी लागावी. -समाजसेवक संजय कडोळे. कारंजा (लाड) : वाशिम जिल्ह्याचा उल्लेख निर्मिती पासून आजतागायत पर्यंत मागासलेला जिल्हा म्हणून होत आलेला आहे.त्यातही महत्वाचे म्हणजे वाशिम जिल्ह्यातील आमदारांचा,गेल्या वीस वर्षापासून राज्याच्या मंत्री मंडळात मुख्यमंत्र्याकडून समावेश होत नसल्यामुळे वाशिम जिल्हा विकासापासून कोसो दूर असलेला आकांक्षित जिल्हा ठरलेला आहे.त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी महायुती शासनाने जिल्ह्याच्या कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील पहिल्या स्थानिक महिला आमदार मायमाऊली,श्रीमती सईताई डहाके यांची वाशिम जिल्ह्यातून राज्यमंत्रीमंडळात वर्णी लावण्याची मागणी, जिल्ह्यातील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे यांनी केली आहे. यासंदर्भात अधिक वृत्त असे की, श्रीमती सईताई डहाके ह्या विकासपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या,कारंजा येथील विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष दिवंगत माजी आ. प्रकाशदादा डहाके यांच्या अर्ध्यांगीनी असून स्व. प्रकाशदादा डहाके यांचा विकासाचा वारसा त्या उत्तम प्रकारे चालवीत आहेत. सद्यस्थितीत त्या आशिया खंडातील पहिली बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्या महिला सभापती आहेत.तसेच जिल्हा परिषद,पंचायत समिती सह सेवा सहकारी संस्थामध्ये त्यांच्या गटाचे प्राबल्य आहे.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांनी कारंजाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी.अशाप्रकारे घवघवीत मताधिक्य मिळवीत विजय मिळवीला आहे.आपल्या शांत, सयंमी,मनमिळाऊ, ममतामयी,विश्वासू,कार्यदक्ष स्वभावामुळे त्यांची ओळख मायमाऊली अशी झालेली आहे. म्हणूनच आजच्या परिस्थितीत जिल्ह्यातील राजकिय नेत्यांमध्ये त्या सर्वाधिक लोकप्रिय महीला आमदार ठरल्या आहेत.याचा विचार करून महायुती सरकारने त्यांची वर्णी राज्यमंत्रीमंडळात लावून कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाला मंत्रीपद द्यावे.व वाशिम जिल्ह्याच्या विकासाला चालना द्यावी.अशी आग्रही मागणी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त, दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे यांनी केली आहे.