ब्रम्हपुरी तालुका अनुसूचित जाती/जमाती सेलच्या तालुकाध्यक्षांना पक्षकार्यासाठी चारचाकी वाहन आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वतीने भेट देण्यात आली आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यात काॅंग्रेस पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद मोटघरे व अनुसूचित जमाती सेलचे तालुकाध्यक्ष जगदीश आमले यांना हे चारचाकी वाहन नुकतेच देण्यात आले आहे.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राजेश कांबळे, बाजार समितीचे संचालक दिवाकर मातेरे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सहसचिव प्रा.डि.के.मेश्राम, सोमाजी उपासे हे उपस्थित होते.