अकोला:- स्व वसंतराव बापू देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रिधोरा येथे नुकतीच सायबर सुरक्षा बाबत कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी अकोला येथील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयातील कु. चंचल निंबाळकर, आणि कु. ईश्वरी मोकळकर ऑनलाइन फसवणूक, वाढता ऑनलाइन सोशल मीडियाचा वापर व त्यामधून होणारी फसवणूक, आपण करीत असलेली ऑनलाईन खरेदी नवनवीन मोबाईल मध्ये येणारे ॲप बनावट वेबसाईट द्वारे होणारा गैरवापर अकाउंट हॅकिंग कसे केले जाते, फेक वेबसाईट कशा ओळखाव्या या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा क्विक हिल फाउंडेशन पुणे आणि महाराष्ट्र सायबर यांच्या सहयोगाने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एम. सर, समन्वयक डॉ. दीप्ती पेटकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. कार्यशाळेचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री मुकेश गव्हाणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक व शिक्षिका श्री धनंजय खेळकर, दत्तात्रय अढाऊ, कु. पुष्पा नवरखेडे मॅडम, कु. अलका झाकर्ड मॅडम, श्री शरद गोमासे सर, श्री मनोज अग्रवाल सर, दीपक पोटे सर, दिलीप लोणकर सर व सर्व शाळेचे विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.