नुकताच मार्च 2023 चा एस.एस.सी. चा निकाल जाहीर झाला असून लोक विद्यालय गांगलवाडी येथील एस.एस.सी. चा निकाल 98.57 %लागला आहे यामध्ये ओम तुळशीदास धोटे यांनी 85.60% घेऊन शाळेतून पहिला क्रमांक पटकावला आहे. द्वितीय क्रमांक सुनील लालाजी तोंडरे यांनी 84.20% घेऊन द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक कु.जान्हवी दामोदर प्रधान हिने 82.80% घेऊन पटकावला तर कु.साक्षी राजू तोंडरे हिने 82% घेऊन चौथा क्रमांक पटकावला आहे.
वरील सर्व विद्यार्थी/ विद्यार्थिनी हे बरडकिन्ही गावचे रहिवासी असून बरडकिन्ही गावचे विद्यार्थी गुणवत्ताधारक असल्याचे सिद्ध झाले आहे.निकाल माहीत झाल्यानंतर वरील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे बरडकिन्ही गावांत कौतुक केले जात आहे ब्रह्मपुरी पंचायत समितीचे माजी सभापती तथा भाजयुमो ब्रह्मपुरीतालुक्याचे तालुकाध्यक्ष रामलाल महादेव दोनाडकर यांनीअभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
लोक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.टिचकुले सर , बुराडे सर, कुथे मॅडम, बुरडे सर, दोनाडकर मॅडम, समर्थ मॅडम , इचकापे सर, रामटेके सर, मेश्राम मॅडम,मेश्राम सर , राऊत सर, नरुले मॅडम,नागमोती मॅडम, घुबडे मॅडम, गजबे सर, निकुरे सर इ.लोक विद्यालय गांगलवाडीचे शिक्षकवृंद सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी/ विद्यार्थिनींच्या घरी जाऊन सत्कार केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.