कुरखेडा. :- कुरखेडा-मालेवाडा मार्गावर सालाईटला गावाजवळ चारचाकी वाहनाने सायकलला धडक दिल्याने सायकल स्वार केवळराम केशव पोरेटी वय (58) रा सालाईटोला हे जागीच ठार झाले ही घटना गुरूवार रोजी सांयकाळी 4 वाजताच्या सुमारास घडली. मृतक केवळराम पोरेटी हे स्वगाव सालाईटोला येथून काही कामानिमित्य कुरखेडा येथे सायकलने येत असताना मागून वाहनाने येणाऱ्या वाहनाने त्याना धडक दिली अपघातात ते जागीच ठार झाले घटनेची माहिती मिळताच पोलिस हवालदार गोंडाने, कन्नाके यानी घटनास्थळावर पोहचत पंचनामा केला व शव ताब्यात घेत उत्तरीय करिता कूरखेड़ा तपासणी करिता उपजिल्हा रुगणालयात आणले अद्यात वाहन चालकाविरोधात गून्हा दाखल करीत तपास सुरू करण्यात आला आहे.