कारंजा : -- इंटरनॅशनल कौन्सिल एज्युकेटर ऑफ वर्ल्ड वाइड प्रिन्सिपल ICWP इंटरनॅशनल इंटरशिप युनिव्हर्सिटीतर्फे नुकताच, कार्यालय इंडिया इंटरनॅशनल सेंटर, फाइव्ह स्टार हॉटेल, दिल्ली येथे ग्लोबल एज्युकेटर सिम्पोजियम अवॉर्डचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कारंजा (लाड) येथील आदर्श सामाजिक कार्यकर्त्या सौ कविता गजानन सवाई यांचा कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी, दिल्ली येथील राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त, लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणार्या कर्मठ पोलिस उपनिरिक्षक किरण शेट्टी मॅडम यांचे हस्ते स्मृतिचिन्ह ,प्रमाणपत्र देऊन आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सौ कविता सवाई यांना सन्मानित करण्यात आले.
सदरहु कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जगातील विविध देशांचे राजदूत आणि परदेशी प्रतिनिधी उपस्थित होते. या पुरस्कार कार्यक्रमात शिक्षक, नेते, प्राचार्य, संचालक आणि परिवर्तन घडवणाऱ्यांना आणि समाजाप्रती प्रशंसनीय कार्याबद्दल त्यांच्या शैक्षणिक क्षेत्र नुसार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
त्यांना सदरहु पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल त्यांचे विविध क्षेत्रामधून अभिनंदन करण्यात येत असून विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे, नंदकिशोर कव्हळकर, रोमिल लाठीया, डॉ ज्ञानेश्वर गरड, डॉ इम्तियाज लुलानिया, महिला कार्यकर्त्या निता लांडे, रेणुका जाधव, शहनाझ बेनीवाले, रेणुका तायडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.