कारंजा लाड – स्थानिक श्री बालाजी मंदिरात श्री रामदेव बाबा सेवा सत्संग समिती व सुंदरकांड समितीच्या संयुक्त विद्यमाने श्री रामदेव बाबांचा भाद्रपद जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व अपार श्रद्धेने साजरा केला जात आहे.
रविवार, दि. २४ ऑगस्ट रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या बीज तिथीला श्री रामदेव बाबांचा जन्मोत्सव विधिपूर्वक पार पडला. सकाळी ८ वाजता ध्वजारोहणानंतर बाबांचा अभिषेक, पूजा व आरती करण्यात आली. दररोज सकाळी व रात्री ७ ते ९ वाजेपर्यंत भजन-कीर्तन, आरती व रामदेव चाळीसा यांचे आयोजन केले जात आहे.
रामदेव बाबा सत्संग सेवा समितीचे अध्यक्ष किशोर साबूजी यांच्या नेतृत्वाखाली समितीचे सर्व सदस्य सक्रिय आहेत. राजस्थानी समाजातील सर्व स्त्री-पुरुष व भक्तगण दररोज आरती व चाळीसामध्ये सहभागी होत आहेत. दररोज रात्री रामदेव बाबांचा हवन विधिवत पार पाडला जातो, ज्याचे संचालन पंडित अजय महाराजजी करीत आहेत. भक्तगण हवनात आहुती देऊन पंडितजींकडून रक्षा सूत्र बांधून घेतात.
हा धार्मिक सोहळा अखंड १० दिवस चालणार असून, मंगळवार, दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी याचा समारोप होणार आहे. या कालावधीत दररोज मंदिरात विद्युत रोषणाई केली जाते, ज्यामुळे संपूर्ण परिसर भव्य आणि दिव्य तेजाने उजळून निघतो. समारोप दिनी (२ सप्टेंबर) सकाळी पूजा-अर्चना व कार्यक्रमानंतर किशोर व मनीष साबूजी यांच्या परिवारातर्फे महेश भवन येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भक्तगण प्रसादीचा लाभ घेतील.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खालील सदस्य सक्रिय राहिले –
किशोर साबू, विनोद सावना, अमर जोशी, अरुण साबू, डॉ. पोकरणा, गट्टानीजी, गिरधारीलाल धूत, कल्पेश धूत, महेश अग्रवाल, मोतीभाऊ बांग, मुन्ना चितलांगे, नितिन बजाज, पवन भरुच, पवन खीची, प्रशांत काकाणी, राजुभाऊ अट्टल, रूपेश बाहेती, ऋषिकेश रुनवाल, शंभू तापडिया, शंभू लाठिया, सुर्यकांत खोपे, विजु तोतला व विपुल तोतला – यांनी आपली सेवा दिली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....