कारंजा/वाशिम : महाविकास आघाडीचे कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय तरुण तडफदार उमेद्वार अँड ज्ञायक राजेंद्र पाटणी यांचा मतदाराच्या विकासाकरीता असलेला सेवाभाव बघून,त्यांचे वाशिमचे चाहते स्वेच्छेने आपल्या कारंजा मतदार संघातील खेडोपाडीच्या नातेवाईक आणि मित्र मंडळीच्या भेटीगाठी घेत आहेत.यामुळेच महाविकास घटक पक्षातील राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते तथा पाटणी परिवाराचे निकटवर्ती माजी प्राचार्य डॉ. के.बी. देशमुख यांच्या नेतृत्वात त्यांचे मित्र मंडळी वाशिम येथील संत गजानन महाराज मित्र मंडळाचे बाळासाहेब कव्हर, इंजि. अशोक बुंदे, बाळासाहेब वाघ, खासबागे बंधू इत्यादींनी वाशिम येथून कारंजासाठी निघत असतांनाच आपले मित्र तथा श्री कामाक्षा देवी संस्थान कारंजाचे मुख्य गोंधळी संजय कडोळे यांचेशी भ्रमणध्वनीवरुन संवाद साधीत आई कामाक्षा मातेच्या दर्शनाने प्रचार प्रारंभ करण्याची कल्पना दिली.व कारंजा येथे पोहोचताच सर्वप्रथम आसाम गोहाटी येथील सिद्ध मातृशक्तिपिठ असलेल्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या श्री कामाक्षा मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर दत्तउपासकाचे श्रध्दास्थान श्री नृसिह सरस्वती स्वामी महाराज यांच्या जन्मस्थळी देखील दर्शन घेऊन श्री गुरुमंदिर कारंजाला भेट दिली.याप्रसंगी श्री कामाक्षा देवी संस्थानचे अध्यक्ष दिगंबरपंत महाजन, रोहीत महाजन, श्री कामाक्षा देवीचे प्रमुख गोंधळी संजय कडोळे यांनी त्यांचे स्वागत केले.त्यानंतर त्यांनी कारंजा शहरातील सर्व मित्रमंडळीच्या भेटीगाठी घेतल्या तसेच विवेकजी पाटणी यांची सदिच्छा भेट घेऊन ग्राम सोहोळ कडे मार्गक्रमण केले.