वाशिम, : बाल सुरक्षा अभियान जन्म मृत्यु नोंदणी, "स्पर्श" कुष्ठरोगी जनजागृती अभियान याबाबत तालुकास्तरीय समितीची सभा गटविकास अधिकारी, पंचायत समिती कारंजा यांच्या कक्षात आज २७ जानेवारी रोजी समितीचे अध्यक्ष, सचिव व सदस्य यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. गटविकास अधिकारी एस.पी. पडघण व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण जाधव यांनी सभेत "बाल सुरक्षा अभियान" याबाबत म्हणाले की, कार्यक्षेत्रातील ० ते १८ वर्षापर्यतच्या बालकांची किशोरवयीन मुला-मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे, कार्यक्षेत्रात आढळलेल्या बालकांवर त्वरीत उपचार करणे, गरजू आजारी बालकांना संदर्भसेवा देऊन उपचार करणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे आहे. शासकीय व निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, खाजगी शाळा, आश्रमशाळा, अंधशाळा, दिव्यांगशाळा, अंगणवाडया, खाजगी नर्सरी, बालवाडया, बालगृहे, बालसुधारगृहे, अनाथ आश्रम, समाज कल्याण, आदिवासी विभाग वस्तीगृहे, शाळा बाहय मुले-मुलींची या ठिकाणी तपासणी केली जाईल.
जन्म मृत्यु नोंदणीबाबतची समिती स्थापन करण्यात आली असून कार्यक्षेत्रातील वेळेत जन्म, मृत्यु नोंदणी करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. जेणेकरुन जनतेस प्रमाणपत्र मिळवितांना अडचणी जाणार नाही. कुष्ठरोग कार्यक्रम, तालुका समन्वय समितीतील अध्यक्ष, सचिव व सदस्य यांच्या उपस्थित “स्पर्श ” कुष्ठरोग जनजागृती अभियान ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत असल्यामुळे कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा. जेणेकरुन आपल्या आजाराचे निराकरण होईल आणि निरोगी शरीर राहील.
सभेला गटशिक्षण अधिकारी श्रीकांत माने, एकात्मीक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. जाधव, सर्व वैद्यकिय अधिकारी कर्मचारी हजर होते .
आपल्या प्रतिक्रिया द्या....