कारंजा : दि. 12 ऑगस्ट, मंगळवार रोजी दुपारी 1 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात, भाजपाच्या महत्वपूर्ण बैठकीत,भाजपा तालुका मंडळ, कामरगाव मंडळ आणि कारंजा शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यावेळी बैठकीचे अध्यक्षस्थान आमदार सौ. सईताई डहाके यांनी भूषविले. प्रमुख उपस्थितीत भाजपा वाशिम जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, जिल्हा सरचिटणीस डॉ. राजीव काळे, जेष्ठ नेते नरेंद्र गोलेच्छा, जिल्हा उपाध्यक्षा सौ. सविता काळे, म.प्र. कार्यकारिणी सदस्य विजय काळे, निरंजन करडे, तालुका अध्यक्ष अमोल ठाकरे, कामरगाव मंडळ अध्यक्ष संजय लाहे आणि शहर अध्यक्ष सौ. प्राजक्ता माहीतकर यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेचे आणि पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी आमदार डहाके म्हणाल्या की, "भाजपा पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे कोणी लहान-मोठा नसून प्रत्येक कार्यकर्ता पक्षाचा प्रमुख आहे. कार्यकर्ता मोठा झाला की पक्ष मोठा होतो. माझी गरज जिथे भासेल तिथे मला निःसंकोचपणे हाक द्या. पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता हा भाजपा परिवाराचा अविभाज्य घटक आहे."
यानंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. त्यामध्ये –
कारंजा तालुका ग्रामीण मंडळ
सरचिटणीस – मयुर लळे, प्रशांत चौधरी
उपाध्यक्ष – राजु खोड, गजानन ढोकने, संजय घुले, निखील काळे, सौ. सुनिता ढोले, राजेश गाढवे
चिटणीस – संदीप तोडासे, सौ. प्रझा मनवर, केशव जाधव, चंद्रकीरण भिंगारे, अमोल डांगे, रामेश्वर वंड
कोषाध्यक्ष – नितीन उपाध्ये
कारंजा कामरगाव ग्रामीण मंडळ
सरचिटणीस – नरेंद्र पायघण, उमेश ठाकरे, शांताराम पवार, उमेश भोजने, आशिष तुरक, सुनिल ठाकरे, संदीप शिवहरे, सौ. रंजना गालफाडे
चिटणीस – मनिष राठोड, सुरेंद्र हीरडे, झानेश्वर करडे, सौ. अनुसया जाधव
कोषाध्यक्ष – राजेंद्र अघम
कारंजा शहर मंडळ
सरचिटणीस - प्रसन्ना पळसकर
उपाध्यक्ष – अविनाश फुलउंबरकर, संतोष धोंगडे, राजु पाटील मोरे, हरीष मनुजा, सौ. शुभांगी कौडण्य, सौ. चंदाताई कोळकर
चिटणीस – सौ. पल्लवी डेडुंळे, अक्षय श्रीराव, अक्षय जोशी, अमोल अघम, तेजस उखळकर, राजु ढोके
कोषाध्यक्ष – प्रभाकर घोडसाळ
सोशल मीडिया प्रमुख – आदर्श उटाळे
आपल्या प्रतिक्रिया द्या....