ब्रम्हपुरी : दिनांक,१६/०८/२३ अधिक मासाच्या समाप्ती चा शेवटचा दिवस म्हणून काही धार्मिक लोक नदीवरती गंगा स्नान करून धार्मिक भावना आणि पावित्र्य जपण्याचे कार्य करतात.ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव येथील रहिवाशी हल्ली मुक्काम कुर्झा निवासी गोपाल अरुण नाकतोडे वय 22 वर्षे हा कुर्झा येथे आपल्या बहिणीकडे बऱ्याच दिवसापासून राहत होता.तो ब्रह्मपुरी येथील सालवंट कंपनीमध्ये दोन-तीन वर्षापासून ट्रक चालक म्हणून काम करीत होता.
आज अधिक महिन्याचा शेवटचा दिवस होता म्हणून धार्मिक भावना जोपासण्याच्या आणि त्याचे पावित्र्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी गंगास्नान (आंघोळ) करण्यासाठी कुर्झा येथे राहणाऱा भाटवा यशवंत अशोक ठेंगरी व इतर मित्रासह सकाळी ठीक ७:००ते ७: ३०वाजताच्या दरम्यान मौजा भालेश्वर येथील देवस्थान वैनगंगेच्या घाटावर आंघोळ करण्यासाठी गेला असता आंघोळ करता करता गोपाल खोल पाण्यात गेला.त्याला त्या ठिकाणी असलेल्या खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्याबाहेर परत आलाच नाही.
भालेश्वर घाटावर एक व्यक्ती बुडून मरण पावला अशी बातमी वाऱ्यासारखी पसरताच नातेवाईक, मित्रमंडळी ,गावकरी यांनी भालेश्वर घाटावरील वैनगंगा नदीवर धाव घेतली. बघ्यांची एकच गर्दी उसळली.ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला याची माहिती मिळताच अ-हेरनवरगाव बीटाचे जमादार अरुण पिसे, पोलीस शिपाई पुरुषोत्तम माधव भरडे व अन्य सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
गोपाल अरुण नाकतोडे ज्या ठिकाणी बुडाला त्या ठिकाणापासून तर आजूबाजूचा परिसर जमादार अरुण पिसे यांनी आपल्या देखरेखीखाली गोपाल चा शोध भालेश्वर येथील नागरिकांच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न केला परंतु थांगपत्ता लागेना.! नंतर चंद्रपूर येथील एनडीआरएफ टीमला मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पाचारण केले आहे. सायंकाळच्या सुमारास शोधमोहिमे दरम्याच्या गोपालचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ टीमला यश आले. आणि गोपाल चा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालय ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले.
गोपाल हा अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा असल्यामुळे गोपालच्या जाण्याने नाकतोडे कुटूंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून गाव परिसर शोकसागरात बुडाललेला आहे
घटनेचा पुढील तपास संबधित पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी करीत आहेत.