कारंजा:-
ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने भारत सरकार पुरस्कृत रमण विज्ञान केंद्र नागपूर,माध्यमिक शिक्षण विभाग जि.प.वाशिम यांचे सौजन्याने रमण वैज्ञानिक फिरते बसचा उपक्रम जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे आयोजित केला होता.दरम्यान बसमधील विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य मीनाताई भोने, सरपंच साहेबराव तुमसरे,शाळा समिती अध्यक्ष दिपाली लोमटे,शाळा समिती सदस्य मजहर खान,शिक्षणतज्ञ डी.आर.भटकर,सौदागर, मुख्याध्यापक प्रा.सुरेश राठोड या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
रमण फिरते विज्ञान प्रदर्शना वेळी रमण विज्ञान केंद्राचे टिम लिडर सायन्य कम्युनिकेटर गौरव अहेर,युनीट कंट्रोलर पवन डाखोळे, टेक्निशियन आनंदराज शर्मा यांनी फिरते विज्ञान प्रदर्शनाचे चांगले नियोजन केले व विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयी वैज्ञानिक गोडी निर्माण व्हावी याविषयी सांगितले.वैज्ञानिक होणे मोठी गोष्ट नसून वैज्ञानिक होण्यासाठी तशी विज्ञान दृष्टी निर्माण करण्याचे आवाहन केले. तसेच या फिरते विज्ञान प्रदर्शनिविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सांगितली. फिरते विज्ञान प्रदर्शनीमध्ये कामरगाव परिसरातील एकुण १७ शाळांनी सहभाग घेतला त्यामध्ये जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव,जि.प.शाळा बेलखेड,जि.प.मुलींची शाळा कामरगाव,अन्वार उर्दू हायस्कुल कामरगाव,जि.प. वरिष्ठ उर्दू शाळा इंदिरा आवास कामरगाव,जि.प. प्राथ.उर्दू केंद्र शाळा कामरगाव,जि.प.शाळा बांबर्डा,जि.प.वरिष्ठ प्राथ.केंद्र शाळा खेर्डा बु,जि.प.शाळा टाकळी खु,जि.प.शाळा टाकळी बु,जि.प. वरिष्ठ प्राथ.शाळा बेंबळा,जि.प.वरिष्ठ प्राथ.शाळा लाडेगाव,आशा इंटरनॅशनल स्कूल कामरगाव,श्री.नृसिंह सरस्वती विद्यामंदिर बेलखेड कामठा,जि.प.प्राथ.शाळा ब्राम्हणवाडा,जि.प.शाळा शिवण,कस्तुरी इंग्लीश स्कूल कामरगाव,जि.प.मुलांची शाळा कामरगाव,स्वामी समर्थ इंग्लिश स्कूल कामरगाव,ज्ञानप्रकाश विद्यालय खेर्डा बु, जि.प.प्राथ. शाळा खेर्डा खुर्द या शाळांनी सहभाग घेतला.१७ शाळेच्या २७६० विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनीला भेट दिली व विज्ञानावर आधारीत प्रयोग व प्रात्यक्षिक समजून घेतले.
प्रदर्शनीत बस मध्ये २० प्रयोग मांडण्यात आलेले होते.सदर प्रदर्शनीमध्ये २४ विद्यार्थी स्वयंसेवकानी प्रदर्शनी पाहायला आलेल्या विद्यार्थ्यांसमोर सादरीकरण केले. या वीस प्रयोगांची माहिती विद्यार्थ्यांनी प्रदर्शनी पाहायला आलेल्या प्रेक्षकांना दिली.
जिल्हा परिषद विद्यालय कामरगावच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा जवळपास ४० विज्ञान प्रयोगाची यावेळी मांडणी करून त्याचे सादरीकरण केले. विशेष म्हणजे प्लास्टिक बॉटल पासून सर्व प्रयोग विद्यार्थ्यांनी केले होते. वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांनी संग्रहित केलेला दगडांचा कल्पक व सुंदर संग्रह सुद्धा यावेळी प्रदर्शनी पाहण्याकरता आलेल्या विद्यार्थ्यांना पाहता आला.यावेळी रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वनस्पती पेशी,प्राणीपेशी, श्वसनसंस्था,पचनसंस्था, उत्सर्जन संस्था,रक्तभिसरण संस्था, दातांचे प्रकार, अन्नसाखळी,हृदयाची रचना यासारख्या रांगोळ्या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी काढल्या होत्या.यावेळी शंख व शिंपले प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रदर्शनी पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉईंट सुद्धा तयार करण्यात आला होता.या सेल्फी पॉइंटचा आनंदही विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी टॅटू सेंटरची निर्मिती सुद्धा या फिरत्या रमन विज्ञान प्रदर्शनाच्या वेळी करण्यात आली होती.टॅटू सेंटरच्या माध्यमातून जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव च्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनी पाहायला आलेल्या इतर शाळांच्या शेकडो विद्यार्थ्यांच्या हातावर विज्ञानाच्या सिम्बॉलचे आकर्षक टॅटू काढून दिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता तोडकर, प्रास्ताविक गोपाल खाडे तर आभार दिपाली खोडके यांनी मानले.२४ डिसेंबरला कारंजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांनी भेट देऊन शिक्षक व विद्यार्थी यांचे कौतुक केले.असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला मिळाल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले. त्यांचे माहिती प्रमाणे सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता मुख्याध्यापक सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात पर्यवेक्षक गोपाल खाडे, विकास रुईकर, मनीष राऊत यांचेसह शिक्षक नीता तोडकर,दिपाली खोडके,सतीश चव्हाण,चंद्रशेखर पिसे,पुष्पा व्यवहारे,,भूमिका भाकरे,प्रमोद सांगळे,अरुण चव्हाण,दिलीप आंबेकर,धनंजय घुले,रूपाली लोखंडे,रूपाली तायडे,मनीष राऊत,शिल्पा राठोड,नम्रता पाटील,दुर्गा भामकर,आनंद शिंदे,धनंजय वैद्य,संदीप निखाते,गोविंद भोंडने,शितल देशमुख,धनु गारवे कैलास वानखडे,सारंग गुल्हाने,संतोष राठोड,अंकिता किर्दक,प्रशांत वार्डेकर,नारायण एकनार,महेश चिकटे हे शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....