कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : सामाजिक कार्यामधून राजकीय जीवनाची सुरूवात केली जात असते.आणि राजकारण करतांना खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचे असेल.स्वतःच्या पदाचा आणि पैशाचा अहंकार बाजूला सारून,सदैव गरीबातील गरीब मतदारामध्ये समरस व्हावे लागते.तळागाळातील सर्वसामान्य मतदाराच्या सुखंदुःखात सहभागी होऊन, गोरगरीब सर्वसामान्य मतदाराच्या हृदयात स्थान मिळवावे लागते. गरीबाच्या हाकेला अगदी मध्यरात्री सुद्धा साद द्यावी लागते. आणि नेत्याचे हे असे मिळून मिसळून गोरगरीबामध्ये वागणे असले तर गोरगरीब मतदारांना असा नेता सदैव हवा हवासा वाटत असतो.व जे कार्य एखाद्या धनाढ्य नेत्याचा पैसा करणार नाही. त्यापैक्षा शंभर पट कार्य त्याचा सामान्य मतदारा मध्ये मिसळणारा सुस्वभाव करीत असतो. परंतु आजकाल प्रत्येक पक्षामध्ये हल्ली दिल्ली पासून तर गल्ली पर्यंतचे राजकारण गढूळ होत चालले असून,आजच्या नवख्या नेते कार्यकर्त्याला पदाचा एवढा अहंकार चढतो की,मग ते जाणून बुजून स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्याकरीता जुन्या जाणत्या अनुभवी नेत्यांना प्रत्येक पक्षात डावलत असतात. हे कटूसत्य नाकारता जाऊ शकत नाही.कारण अखेर वस्तुस्थितीची जाण वास्तव स्थितीत राजकारणाशी देणेघेणे नसणाऱ्या,सर्वसामान्य मतदारांनाही कळत असते. कारंजा येथील स्थानिक काँग्रेस कमेटीचे शहर अध्यक्ष म्हणून स्थानिक काँग्रेसचे एकनिष्ठ नेते अरविंद लाठीया उपाख्य बटूकसेठ लाठीया हे स्वतः असतांना कारंजा शहरातील काँग्रेसची स्थिती अतिशय मजबूत होती. तसे पाहीले तर आपली संपूर्ण हयात त्यांनी काँग्रेसमध्ये घालवीलेली असून,त्यांच्या पुढाकाराने गुलामनबी आझादांच्या वाशिम लोकसभा निवडणूका पासून तर अनंतराव देशमुख यांच्या विधानसभा लोकसभा,बाबासाहेब धाबेकर यांची विधानसभा निवडणूक तर जिंकून दिलीच.त्याशिवाय जिल्हा परिषद निवडणूका पासून तर नगर पालिका निवडणूका आणि बाजार समिती, खरेदी विक्री निवडणूका पासून तर ग्रामपंचायत निवडणूका कांग्रेसला त्याकाळी जिंकून दिल्यात हा इतिहास नाकारता येऊ शकत नाही.केवळ कारंजा शहरामध्येच नव्हे तर तालुक्यातील पंचक्रोशीतील ग्रामिण भागामध्ये लाठीया परिवाराला माणनारा फार मोठा मतदार जनसमुदाय आहे. हे आजच्या कॉंग्रेसला विसरून चालाता येणार नाही. भविष्यातील स्थानिक कॉंग्रेसला जर नवसंजिवनी द्यायचीच असेल तर आज कॉंग्रेसला अरविंद लाठीया उपाख्य बटूकसेठ लाठीया यांच्या शिवाय येथे दुसरा पर्यायच असू शकत नाही. अरविंद लाठीया यांचेकडे दिर्घानुभव असल्यामुळे ते आजची काँग्रेस बळकट करू शकतात.दुरावलेल्या मतदाराला कॉंग्रेसकडे परत खेचून आणू शकतात.कारण स्वच्छ चारित्र्य, दिलखुलास प्रसन्नता, प्रत्येक मतदार कार्यकर्त्याच्या सुखंदुःखात सहभागी होण्याची आणि माणसं आपल्याकडे टिकवून ठेवण्याची कला, विश्वनियता त्यांचेकडे आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठीनी अरविंद लाठीया यांचेवर कॉंग्रेस पक्षाला नवसंजीवनी देऊन,आगामी सर्वच निवडणूका जिंकून देण्याची जबाबदारी द्यायला हवी.आणि कार्यकर्त्यानी या जुण्या जाणत्या दिर्घनुभवी नेत्याचे मार्गदर्शन व सल्ल्याने आगामी निवडणूका जिंकून कॉंग्रेस पक्षाला बळकट केले पाहीजे असे जुन्या जाणकार काँग्रेस चाहते मतदाराची मागणी आहे.