वाशीम : स्वप्नातही विचार केला नव्हता.अशा तऱ्हेने ऑगष्ट सप्टेंबर या दोन महिन्यात ढगफुटी प्रमाणे अतिमुसळधार पाऊस कोसळून राज्यात चोहीकडे प्रत्येकाच्या शेतात पाणीच पाणी होऊन शेतकऱ्याच्या शेतीतील पिके भुईसपाट होऊन गेली.या परिस्थितीमुळे,खेडोपाडीच्या हातावर पोट असणाऱ्या,भूमिहिन शेतमजूर महिला आणि पुरुष आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटूंबीयाची अक्षरशः उपासमार सुरू असून,त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या मुलाच्या शिक्षणाचा आणि वयोवृद्धांच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील पाच वर्षापूर्वी कोरोना महामारीच्या बेरोजगारीमुळे जशी उपासमारीची परिस्थिती आली होती. अगदी तीच परिस्थिती आजच्या ओल्या दुष्काळाने कामधंद्याअभावी, खेडोपाडीच्या शेतमजूरांवर आलेली आहे.त्यामुळे मायबाप सरकारने राज्यात सर्वत्र ओला दुष्काळ जाहीर करून,गोरगरीब शेतमजूरांसाठी 'शेतमजूर कल्याण योजना' सुरु करण्याची मागणी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी शासनाकडे केली आहे. या संदर्भात अधिक वृत्त असे की, गेल्या तिन महिन्यापासून संततधार पावसामुळे, हातावर पोट असणाऱ्या भूमिहिन शेतमजूरांची शेतातील निंदन, फवारणी, सोंगण्याची व शेतीवर अवलंबून असणारी कामे ठप्प झाल्यामुळे,वस्ती,वाडे व खेडोपाडीच्या शेतमजुरांच्या हाताला काम नाही. वस्ती- वाडा,तांडा-पाडा,खेड्यापाड्यातील आणि शहरात राहणाऱ्या सर्वसाधारण कुटुंबातील झोपडपट्टीतील शेतकाम करणारे महिला व पुरुष शेतमजूर पूर्णतः बेरोजगार झाले असून, त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचे भिषण वास्तव समोर आले असून,त्यांची उपासमार सुरु आहे. इथे दोन वेळ खायलाच अन्न नाही.आणि लेकरांच्या वयोवृद्धांच्या घरखर्चाला पैसा नाही तेथे येणाऱ्या सणासुदीच्या दिवसात लेकरांना कपडालत्ता कसा घ्यावा ? आणि दिवाळीला दोन गोडाचे घास कसे खावे ? तसेच ठेचाचटणीवर घ्यायला तेल नाही तर तेलाचे दिवे कसे लावावे ? असा प्रश्न शेतमजूरांना पडला असून, सणासुदीच्या दिवसात त्यांच्या चेहऱ्यावरील तेज,हास्य आणि आनंद मावळला असून, उपासमारीच्या संकटाच्या काळजीने त्यांचे चेहरे कोमेजले असून त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा ओघळत आहेत. तरी शासनाने शेतमजूरांच्या पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी 'भूमिहिन शेतमजूर कल्याण योजना' राबवावी. त्या योजनेद्वारे शेतमजूरांना त्यांच्या हक्काची कामे पुरवावीत. व आर्थिक मजूरी द्यावी.तसेच ओल्या दुष्काळाचे गांभीर्य ओळखून येणारी दिवाळी साजरी करण्यासाठी आर्थिक सहकार्य व धान्य किराणाची तात्काळ मदत करावी.आणि समाजातील स्वयंसेवी संस्थांनी आणि धार्मिक देवस्थान तसेच सामाजिक राजकिय पक्षाच्या पुढाऱ्यांनी आणि दानशूर व्यक्तींनी सुद्धा पुढे येवून, आपल्यातील 'माणूसकी' जीवंत ठेवून,आसमानी संकटाने बेरोजगार होऊन हताश झालेल्या भूमिहिन शेतमजूरांचीही उदरनिर्वाहाची सोय व्हावी. त्यांनाही दोन घास पोटभर मिळावे.यासाठी त्यांना जीवनावश्यक किराणा,धान्य, कपडे व ब्लॅकेटची मदत देवून, गोरगरीबांना सहारा देवून त्यांना जगण्यासाठी आधार द्यावा आणि या जीवंत देवतांचे आशिर्वाद आणि पुण्य मिळवावे. असे आवाहन,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी केले आहे.