वाशिम : सर्वसाधारणतः चोहीकडे सोडण्यात येत असलेले सांडपाणी,केरकचरा व दुर्गंधी मुळे किटकजन्य डासांची संख्या वाढते.व असे डास चावल्याने हिवताप,डेंग्यू,चिकनगुनिया आदी आजाराचा प्रादुर्भाव वाढतो.सद्यस्थितीत आरोग्य विभागाच्या ताज्या अहवाला प्रमाणे बृहन्मुंबई,पुणे, अकोला, वाशिम जिल्ह्यातील नगर पालिका महानगर पालिका क्षेत्रामध्ये चिकनगुनियाचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत जास्त प्रमाणात असल्याचे सिद्ध झाले आहे.त्यामुळे रुग्नांनी कोणताही ताप आल्यास किंवा आरोग्य विषयक तक्रार असल्यास त्वरीत आपल्या फॅमिली डॉक्टर ; जिल्हा,उपजिल्हा रुग्नालयात वा जवळच्या प्राथमिक रुग्नालयात जावून रक्ताची तपासणी करून औषधोपचार सुरु करावा. यंदा ०१ जानेवारी २०२५ ते दि.०७ मे २०२५ पर्यंत राज्यात चिकनगुनियाचे ७१८ रुग्न आढळून आले आहेत. यंदा पुणे अकोला वाशिम सिंधुदुर्ग पालघर जिल्ह्यात चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्न नोंदवले जाऊन अकोला येथे चिकनगुनियाचे प्रमाण अधिक आढळून आले. विशेषतः एडिस इजिप्ती व एडिस अल्बोपिक्टस जातीच्या डासांद्वारे चिकनगुनियाच्या विषाणुचा फैलाव होतो.संक्रमित व्यक्तीला डास चावल्याने असे डास इतर व्यक्तिला चावल्यास रुग्नांचे प्रमाण वाढत जाते. चिकनगुनिया झाल्याचे लक्षणे म्हणजे तिव्र ताप, सांधेदुखी, गुडधेदुखी, स्नायुदुखी, डोकेदुखी, अंगावर पुरळ उठने अशी असतात. या लक्षणामुळे रुग्नाला थकवा येऊन अनेक आठवडे सांधेदुखीचा त्रास जाणवतो.चिकनगुनियाची लक्षणे वाटत असल्यास त्वरीत फॅमिली डॉक्टरांच्या किंवा जवळच्या आरोग्य केन्द्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने उपचार सुरु करावे.रिहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर पाणी आणि द्रव्यपदार्थ फळाच्या ज्युसचे सेवन करावे.पुरेशी झोप व विश्रांती घ्यावे. डासांच्या संरक्षणासाठी मच्छरदाणी, लोशन व अंग झाकणारे कपडे वापरावे.तसेच मलेरिया,डेंग्यु, चिकनगुनिया पसरविणाऱ्या डासांची उपजकेंद्रे नष्ट करण्याचा प्रयत्न करावा.त्यासाठी महत्वाचे म्हणजे आपल्या घरात, परिसरात सांडपाणी साचणार नाही.याची दक्षता घेऊन पाण्याचा निचरा करावा. केरकचऱ्याची विल्हेवाट लावावी. फवारणी करून घ्यावी. व परिसरात जास्तीत जास्त साफसफाई ठेवून स्वच्छता राखावी.असे आवाहन, स्वच्छतादूत ह्या नात्याने ज्येष्ठ समाजसेवक तथा संत गाडगेबाबा स्वच्छतादूत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संजय कडोळे यांनी केले आहे.