उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती कारंजा लाड जिल्हा वाशीम च्या वतीने उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व सामाजिक सलोखा कार्यशाळा संपन्न झाली उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांनी पी.पी.टि.च्या माध्यमातून सविस्तर कायदा व कायद्याची अंमलबजावणी संदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली.
डॉ .बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या पुढाकाराने आयुक्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पुणे यांच्या आदेशानुसार उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती कारंजा च्या वतीने मानोरा तालुका स्तरावर पोलिस अधिकारी व महसूल अधिकारी व कर्मचारी तसेच पंचायत समिती स्तरावरील सर्व अधिकारी कर्मचारी आणि गाव पातळीवरील पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यासाठी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 सुधारित अधिनियम 2016 अन्वये ॲट्रॉसिटी कायदा प्रशिक्षण कार्यशाळा व सामाजिक सलोखा या विषयावर महत्त्वपूर्ण प्रशिक्षणाचे आयोजन उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती कारंजा माध्यमातून करण्यात आले आहे या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाशिम शाखेचे कार्याध्यक्ष तथा अशासकीय सदस्य जादूटोणाविरोधी कायदा प्रचार प्रसार व अंमलबजावणी समितीचे पी.एस. खंदारे यांनी नागरी हक्क संरक्षण कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याची कलमनिहाय विस्तृत माहिती देऊन ॲट्रॉसिटी कायदा हा खऱ्या अर्थाने समाजातील भेदभाव नष्ट करणारी एक जिवनपद्धती आहे व कोणत्याही गावात जातीच्या कारणावरून वादविवाद होणार नाहीत यासाठी संत समाज सुधारकांच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्याचे आवाहन केले तसेच ॲट्रॉसिटी कायद्याची योग्य अंमलबजावणी व्हावी म्हणून शासनाने जे वेळोवेळी परिपत्रक शासन निर्णय काढलेले आहेत त्याचे दाखले देत पी.पी.टी. च्या माध्यमातून सोप्या भाषेत ॲट्रॉसिटी कायदा समजावून सांगितला तसेच प्रत्येक गावांमध्ये एक गाव एक पाणवठा व एक गाव एक स्मशानभुमी हि संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी समाजातील धुरीण लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे तसेच आपले गाव व भेदभाव मुक्त सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे आवाहन पी. एस. खंदारे यांनी केले,कार्यशाळा कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून तहसीलदार डॉ . संतोष येवलीकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी डॉ.प्रफुल्ल बोराडे,मानोरा पोलिस स्टेशन चे ठाणेदार प्रविण शिंदे, हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रविण काटकर यांनी केले कार्यक्रमाला तालुक्यातील बहुसंख्येने अधिकारी व कर्मचारी आणि पोलिस पाटील उपस्थित होते