अकोला :-शेगावातील गजानन महाराज संस्थानच्या आनंदसागरविरुद्ध दाखल केलेली याचिका नागपूर खंडपीठाने निकाली काढून याचिकाकर्त्यांवर दहा हजार रुपये दंडात्मक खर्च बसविला. अशोक गारमोडे, असे याचिकाकर्त्यांचे नाव असून त्यांनी शेगाव संस्थानविरुद्ध द्वेषभावेतून याचिका दाखल केली होती. परंतु, याचिका ही द्वेषभावनेतून दाखल करण्यात आल्यामुळे न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अनिल किलोर यांनी निकाली काढली. अशोक गारमोडे संस्थानमध्ये सेवेकरी आले होते. त्यामुळे त्यांनी औद्योगिक न्यायालयात तक्रार दाखल केली. याचिकाकत्यांन न्यायालयात केलेली तक्रार बेकायदेशीर असून ते संस्थानचे कर्मचारी नाही तर एक सेवेकरी होते.
त्यामुळे औद्योगिक न्यायालयाने त्यांची याचिका खारीज केली. यानंतर अशोक गारमोडे यांनी २०१९ मध्ये हायकोर्टात आनंदसागर व सौंदर्याकरणाविरुद्ध जनहित याचिका दाखल केली. याप्रकरणी हायकोटाने नोटीस बावली होती. नंतर संस्थानने नगर परिषदेतून या प्रकरणाची कॉपी घेऊन संस्थानला प्रतिवादी करावे, याकरिता हायकोर्टात अर्ज केला. हायकोर्टाने फेब्रुवारी २०२० मध्ये संस्थानचा अर्ज मंजूर केला. हायकोर्टाने अशोक गारमोडे यांना याचिकेत सुधारणा करण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. तसेच सुनावणीदरम्यान गारमोडे गैरहजर राहिले. संस्थानने हायकोर्टात उत्तर दाखल केले. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान हायकोटनि याचिका निकाली काढून याचिकाकर्त्याला दहा हजार रुपये दंड बसविला. गजानन महाराज संस्थानतर्फे अॅड. अरुण पाटील, न.प.तर्फे अॅड. दिग्विजय खापरे, सरकारतर्फे अॅड. दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली.