वरोरा तालुका प्रतिनिधी-
आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज नगर परिषद सभागृहात जाहीर करण्यात आली असून एकूण 26 जागेकरिता 13 प्रभागातून 13 महिला नगरसेवकांचे आरक्षण काढण्यात आले असून उर्वरित 13 जागा सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक 1 करिता अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण जागा, प्रभाग क्रमांक 2 करिता सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 4 करिता सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण जागा, प्रभाग क्रमांक 5 करिता अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण ,प्रभाग क्रमांक 6 करिता सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण जागा करिता आरक्षित आहे.
तसेच प्रभाग क्रमांक 7 करिता अनुसूचित जाती (सर्वसाधारण )व सर्वसाधारण महिला,प्रभाग क्रमांक 8 मध्ये अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) व सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक 9 मध्ये सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 10 मध्ये सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण , प्रभाग क्रमांक 11 मध्ये सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण जागा,
प्रभाग क्रमांक 12 करिता सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 13 करिता अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण करिता, राखीव करण्यात आले आहेत.
उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज नगर परिषद सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली त्यावेळी मुख्याधिकारी भोयर हे उपस्थित होते आरक्षण सोडतीच्या वेळी भाजपा, काँग्रेस ,राष्ट्रवादी, शिवसेना व मनसे व काही इतर पक्षांचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार प्रभाग निवडण्यासाठी शोध घेणे सुरू केले असून काही राजकीय पुढाऱ्यांचे प्रभाग आरक्षित झाले असल्याने त्यांच्यासमोर पेच निर्माण झाल्याने ते दुसरे प्रभाग शोधण्याची प्रक्रिया सुरू केले असल्याचे समजते.
तसेच यावेळी प्रभाग रचना बदलल्याने काही वार्ड तोडफोड झाली असल्याने राजकीय समीकरण कसे असेल ते निवडणुका आखाड्यातील उमेदवार यांचेवर ठरू शकेल.
मनिष भुसारी, वरोरा
आपल्या प्रतिक्रिया द्या....