कारंजा (लाड) : कारंजा येथील गोंधळी समाजाचे हर हुन्नरी कलाकार,उत्कृष्ट संबळवादक,डफवादक तथा जिल्हा सत्र न्यायालय अकोला अंतर्गत लिपीक पदावर कार्यरत असलेले स्व.उमेश मधुकरराव कडोळे हे प्रामाणिक, हजरजवाबी,हास्यमुख, सुस्वभावी म्हणून ओळखले जायचे.ते कारंजा येथील ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांचे लहान बंधू होते.कारंजा येथे त्यांचा फार मोठा मित्रपरिवार होता.नोकरीपूर्वी त्यांनी आपल्या गोंधळी कलेच्या जोपासने करीता अथक परिश्रम घेतले होते. मातृशक्ति उपासकांकडून, नवरात्रोत्सव आणि लग्नप्रसंगी त्यांना आवर्जून बोलवीले जायचे. त्यांनी श्री कामक्षा मातेच्या आरत्यांसह गोंधळी गीतांच्या शेकडो रचना केलेल्या असून अनेक समाजबांधवा कडून देवीचे गोंधळजागरणाची प्रस्तुती करतांना त्या प्राधान्याने गायील्या जात असतात.असे उमेश कडोळे हे नोकरी निमित्ताने अकोला गेले असतांना तेथे स्थायीक झाले होते.अचानक त्यांना असाध्य आजाराने ग्रासले.व अखेर उपचारा दरम्यान,संधी न देताच, त्यांचा मृत्यु झाला.एका वयोवृद्ध आईच्या म्हातारपणी तीला पुत्रशोक झाला.तर वडिलभावाला बंधूशोक झाला. ही वार्ता कारंजा शहरात वाऱ्यासारखी पसरताच सर्वत्र शोककळा पसरली. मुखदर्शनाकरीता स्व.उमेश कडोळे यांना जन्मगावी आणतील.अशी सर्वांची अपेक्षा होती.परंतु काही अडचणीस्तव त्यांचा अंत्यसंस्कार अकोला येथेच करण्यात आला.सर्वांशी आपुलकी व प्रेमाने वागणाऱ्या एका सुस्वभावी व्यक्तिमत्वाचा अशा प्रकारे शेवट झाल्याने त्यांचे हितचिंतक,चाहते,शेजारी, मित्रमंडळी व गावकरी यांना हळहळ वाटत असून अनेकांनी त्यांच्या अचानक मृत्युमुळे व्यथीत होवून भ्रमणध्वनीद्वारे, संदेशाद्वारे शोकभावना व्यक्त केल्या आहेत.ही वार्ता वाशिमचे खासदार संजयभाऊ देशमुख यांना समजताच त्यांनी त्यांचे सचिवा मार्फत भ्रमणध्वनीवरून संजय कडोळे यांचे सांत्वन केले. तसेच शिक्षक आमदार ॲड. किरणराव सरनाईक,प्राचार्य डॉ. के.बी.देशमुख,यांनीही शोकभावना व्यक्त करीत दिलासा दिला.विदर्भ लोककलावंत संघटना, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, डिजीटल मिडिया संपादक पत्रकार परिषद,महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद,श्रमीक पत्रकार संघ आदीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः अकोला येऊन स्व.उमेश कडोळे यांच्या वयोवृद्ध आई व भावाचे सांत्वन केले. त्यामध्ये शाहिर देवमनराव मोरे,पत्रकार विजय तेलगोटे, संजय तेलगोटे,प्रदिप वानखडे,गजानन चव्हाण, हभप. माणिक महाराज हांडे (पाटील),प्रा.अशोकराव उपाध्ये, विजय खंडार,बाळकृष्णा काळे, उमेश अनासाने आदींचा समावेश होता. तर मुखमंत्री मा.देवेन्द्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमोलजी पाटणकर, तहसिलदार कुणाल झाल्टे, समाज कल्याणचे दिनेश लहाडके,अखिल भारतिय मराठी नाट्य परिषद मुंबईचे नंदकिशोर कव्हळकर, कारंजा शाखेचे उपाध्यक्ष श्रीकांत भाके, चित्रपट निर्माते दिग्दर्शक डॉ इम्तियाज लुलानिया,डॉ.मुजफ्कर खान,डॉ. कुंदन श्यामसुंदर, डॉ.गजानन गावंडे, डॉ शकिल मिर्झा,माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया,माजी नगराध्यक्ष विजय बगडे, दैनिक मातृभूमिचे निलेश सोमानी,गुरुदेव सेवा मंडळाचे हभप.लोमेश पाटील चौधरी, दैनिक लोकमतचे स्तंभलेखक प्रा.प्रज्ञानंद थोरात, युवाक्रांती समाचार महाराष्ट्र राज्य वेब पोर्टल चे संपादक ब्रम्हपुरीचे पत्रकार गुलाब ठाकरे, दैनिक विश्वजगतचे संपादक गजानन काटे, मदत सामाजिक संस्था नागपूरचे दिनेश बाबू वाघमारे, परिवर्तन कला मंचाचे शेषराव मेश्राम,वॉईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंगचे संदिप पिंपळकर,पत्रकार गणेश लहाने,पत्रकार किरण क्षार, पत्रकार विनोद गणवीर,पत्रकार आरिफ पोपटे,पत्रकार हफिजखान,स्त्रीशक्ति मंचाच्या अध्यक्षा तथा महिला पत्रकार सौ. शारदाताई भुयार,पत्रकार सौ वैशाली चवरे,पर्यावरण प्रेमी सौ.कृपाताई ठाकरे आदींनी श्रध्दांजली व्यक्त केली.असे वृत्त विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे सचिव विजय पाटील खंडार यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....