कारंजा - नुकतेच,नवी दिल्ली येथे माननीय केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते गजेंद्र राठोड यांना प्लान्ट फिजीयोलॉजी या विषयात पी एच डी प्रदान करण्यात आली.या कार्यक्रमाला माननीय उपराष्ट्रपति जयदीप धनखड़ उपस्थित होते.
सर्व साधारण कुटूंबातील असणारा या विद्यार्थ्याचे वडील रमेश राठोड इरिगेशन विभागातील निवृत्त कर्मचारी असुन आई अंबिका राठोड गृहिणी आहे.या विद्यार्थ्याचे १-१२ पर्यंतचे शिक्षण- शिवाजी शिक्षण संस्था, वाशिम येथे झाले व पदवी पर्यंतचे शिक्षण श्री शिवाजी कॉलेज ऑफ एग्रील्चर बायोटेक्नोलॉजी, अमरावती येथे झाले तसेच एम एस सी,
पीएचडी पर्यंतचे शिक्षण इंडियन एग्रीकल्चरल रिसर्च इंस्टीट्यूट, नवी दिल्ली येथे झाले.
सर्व साधारण कुटूंबातील या विद्यार्थ्याने प्राप्त केलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असुन त्याचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कोहिनूर कॉलनी कारंजा येथील सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत असुन भावी जीवनातील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहे. असे वृत्त राजुभाऊ भेंडे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे .