आपल्या देशात कोणताही दिव्यांग सोई सवलती पासून वंचीत राहु नये व त्यांना मनाचे जीवन जगण्यासाठी सरकारने अनेक कठोर नियम व कायदे बनवून त्यांचे जीवनमन उंचावण्यासाठी नगरपरिषद च्या उत्पन्न तुन 5% निधी हा दिव्यांग लोकांना देण्यात यावा तसेच त्यांना विनाअट घरकुल देण्याची तरतूद दिव्यांग कायद्यात केलेली आहे, परंतु या कायद्याची पूर्णपणे अमलाबजावणी होतांना दिसत नाही आहे, तेव्हा दिव्यांग कायद्यानुसार त्यांना 5%निधी वितरित करून ज्या ज्या दिव्यांग लोकांनी घरकुल साठी फॉर्म भरले त्यांना अजूनही विनाअट घरकुल मिळालेले नाही तेव्हा लवकरात लवकर त्यांच्या परिस्थिती चा विचार करून ज्यांनी घरकुल साठी अर्ज केलेले आहेत अश्यापूर्ण दिव्यांग लोकांना लवकरात लवकर घरकुल मंजूर करण्यात यावे, अन्यथा आपल्या नगरपरिषद समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषद प्रशासन ची राहिलं.असे निवेदनात म्हटले आहे निवेदन देताना प्रहार जनशक्ती पक्ष शाखा आरमोरीचे निखिल धार्मिक, दिनकर कुथे,अरविंद धकाते,सुरेश सेलोकर,लक्ष्मण चापले,गोलू नागपुरे,ईश्वर खोब्रागडे आदी उपस्थित होते.